Satara Karad Toll Naka | गुजरात राज्याचे पासिंग असलेल्या वाहनातून 15 लाख रोख रक्कम जप्त; तासवडे-कराड टोलनाक्यावर पोलिसांची कारवाई

Pune PMC Elections | Election Commission team seizes Rs 69 lakh cash, liquor worth crores in municipal elections

सातारा : Satara Karad Toll Naka | विधानसभा निवडणुकीच्या (Maharashtra Assembly Election 2024) पार्श्वभूमीवर पोलिसांकडून जिल्ह्यात ठिकठिकाणी नाक्यांवर पथके निर्माण करून वाहनांची तपासणी सुरू आहे. आज पहाटे एक ते चार वाजण्याच्या दरम्यान तासवडे-कराड टोलनाक्यावर कराडहून साताऱ्याकडे जाणाऱ्या गुजरात राज्याचे पासिंग असलेली महिंद्रा बोलेरो वाहनाचा तळबीड पोलिसांना संशय आल्याने त्यांनी तपासणी केली असता या वाहनात १५ लाख रोख रक्कम मिळून आली. पोलिसांनी धडक कारवाई करत १५ लाख रुपये जप्त केले आहेत. तर दोघांना या कारवाईत ताब्यात घेण्यात आले आहे. (Gujarat Passing Car Caught With Cash At Satara)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने तासवडे टोलनाका येथे तळबीड पोलीस ठाण्याद्वारे एक पथक नियुक्त करण्यात आले आहे. हे पथक २४ तास कार्यरत असून संशयास्पद वाहनांवर नजर ठेवून आहे. यात निवडणुकीमध्ये पैशाचा वारेमाप वापर होऊ नये. तो रोखण्यासाठी ही पथके निर्माण केली असून आज पहाटेच तळबीड पोलिसांकडून विशेष कारवाई करण्यात आली.

आज (दि.२६) पहाटे एक ते चार वाजताच्या दरम्यान कराडहून साताऱ्याकडे जाणाऱ्या महिंद्रा बोलेरो (वाहन क्रमांक GJ 27 EE 8738) ही गाडी पोलिसांना संशयास्पद स्थितीत आढळल्यामुळे पहाटे अडीच वाजता थांबवून तपासणी केली. त्यावेळी साड्या, साहित्य असल्याचे प्रथमदर्शनी सांगण्यात आले. मात्र पोलीस तपासणीत या वाहनामध्ये १५ लाख रुपयांची रोख रक्कम मिळून आली.

दरम्यान निवडणूक भरारी पथकाच्या समोर पंचनामा करून ही रक्कम इन्कम टॅक्स कडे वर्ग करण्यात येणार आहे, असे पोलिसांनी सांगितले. सातारा पोलीस अधिक्षक समीर शेख, अप्पर पोलीस अधिक्षक डॉ. वैशाली कडुकर यांच्या मार्गदर्शनाखाली तळबीड पोलीस ठाण्याचे एपीआय किरण भोसले याबाबत अधिक तपास करत आहेत.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Pune Police Raid On Gambling Den | पुणे: शुक्रवार पेठेतील मटका किंग नंदू नाईकच्या जुगार अड्ड्यावर
पोलिसांचा छापा ! 60 जणांना घेतले ताब्यात, 1 लाखांची रोकड, 47 मोबाईल जप्त

Pune Police Nakabandi News | पुणे: पांढर्‍या पोत्यांमधून आणले जात होते 138 कोटींचे सोन्याचे दागिने; नाकाबंदीत लागले हाताला (Video)

Pune Crime Branch News | रिक्षाचालकाला मारहाण करुन लुबाडणारा चोरटा जेरबंद ! मारहाणीत पायाच्या नडगीचे हाड, मनगटाचे हाड केले होते फॅक्चर

Three Cops Suspended In Pune | पुण्यातील 3 पोलीस कर्मचारी तडकाफडकी निलंबित, जाणून घ्या कारण

You may have missed