Satish Wagh Murder Case | सतीश वाघ यांचा खुनामागे आर्थिक कि अनैतिक संबंध? नेमके कारण काय

Satish Wagh

पुणे : Satish Wagh Murder Case | आमदार योगेश टिळेकर (Yogesh Tilekar) यांचा मामा सतीश वाघ यांचा खुन करण्यामागे त्यांची पत्नी मोहिनी वाघ (Mohini Satish Wagh) हीच मुख्य सुत्रधार असल्याचे समोर आल्याने एकच खळबळ उडाली आहे. पती पत्नीच्या पवित्र नात्याला काळीमा फासणार्‍या या घटनेमागे नेमके कोणते कारण आहे. आर्थिक की अनैतिक संबंध (Immoral Relationship) यापैकी नेमके कोणते कारण आहे, याचा पोलीस शोध घेत आहे. दरम्यान, सतीश वाघ यांचा खुन केला ते हत्यार नवनाथ गुरसाळे व अतिश जाधव या दोघांनी भीमा नदीपात्रात पेरणे फाटा येथे टाकल्याचे समोर आले आहे.

सतीश वाघ यांच्या खुनाची सुपारी देणारी त्यांची पत्नी मोहिनी वाघ हिला आज न्यायालयात हजर करण्यात आले. तिच्याबरोबरच पवन शर्मा, नवनाथ गुरसाळे, विकास ऊर्फ विक्की शिंदे, अक्षय जावळकर यांनाही येरवडा कारागृहात ताब्यात घेऊन न्यायालयात हजर केले होते.

मोहिनी सतीश वाघ हिच्या सांगण्यावरुन अक्षय जावळकर याने त्याच्या साथीदारांना वाघ यांना मारण्याकरीता ५ लाख रुपयांची सुपारी दिलेली आहे. मोहिनी वाघ हिने सुपारी ठरलेल्या रक्कमेपैकी अक्षय जावळकर याला किती रक्कम दिलेली आहे. ती कशा प्रकारे दिलेली आहे. याबाबत तिच्याकडे तपास करायचा आहे. मोहिनी हिचा पती सतीश वाघ यांना मारण्याचा नेमका कोणता उद्देश होता, यामध्ये नक्की आर्थिक कारण आहे की अनैतिक कारण आहे, याचा मोहिनी वाघ हिच्याकडे तपास करायचा आहे.

नवनाथ गुरसाहे याच्याकडे हत्याराबाबर तपास केला असता त्याने व अतिश जाधव या दोघांनी मिळून हे हत्यार भीमा नदी पात्रात पेरणे फाटा येथे टाकले असल्याचे सांगितले आहे. दोन्ही आरोपींना घेऊन जाऊन हत्याराचा शोध घ्यायचा आहे. हे हत्यार नक्की कोठून आणले आहे, याचा तपास करायचा आहे. या गुन्ह्यातील मुख्य सुत्रधार नक्की कोण आहे, याबाबत आरोपींकडे समोरासमोर प्रत्यक्ष तपास करायचा असल्याने पोलीस कोठडी देण्याची विनंती पोलिसांच्या वतीने करण्यात आली. न्यायालयाने सर्वांना ३० डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी मंजूर केली आहे.

गाडीतच सतीश वाघ यांच्यावर वार
सतीश वाघ यांचे शेवरलेट गाडीतून अपहरण केल्यानंतर त्यांच्यावर गाडीतच वार करण्यात आले.
त्यानंतर त्यांचा मृतदेह डिक्कीमध्ये ठेवण्यात आला होता.
त्यामुळे गाडीच्या डिक्कीच्या आतील बाजूला कापडी पट्टीवर रक्ताचे डाग,
तसेच डिक्कीतील कव्हर खाली रक्ताचे डाग तसेच गाडीच्या मागील दरवाज्याच्या आतील बाजूला एका कापडी पट्टीवर,
उजव्या दरवाज्यावर, मध्यभागातील डाव्या दरवाज्यावर रक्ताचे डाग पोलिसांना आढळून आले.
पोलिसांना शेवरलेट गाडीमध्ये आढळलेल्या रक्ताच्या डागावरुन अतिशय निर्घुण पद्धतीने खुन केल्याचे दिसून येत आहे. (Satish Wagh Murder Case)

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Goyal Properties Pune | राष्ट्रीय ग्राहक संरक्षण आयोगाचा गोयल प्रॉपर्टीज या बांधकाम कंपनीला दणका,
घर खरेदीदारांना दोन महिन्यात रक्कम सव्याज परत करण्याचे आदेश

Shivaji Road Pune Accident News | मद्यधुंद कारचालकाची अनेक वाहनांना धडक;
लोकांनी पकडून दिले पोलिसांच्या ताब्यात (Video)

You may have missed