Satish Wagh Murder Case | भाजप आमदार योगेश टिळेकर यांच्या मामाच्या हत्येची सुपारी मामीनेच दिल्याची धक्कादायक माहिती समोर, मामीला अटक

Satish Wagh

पुणे : Satish Wagh Murder Case | भाजप आमदार योगेश टिळेकर (Yogesh Tilekar) यांचे मामा सतीश वाघ यांच्या हत्येची सुपारी त्यांची पत्नी आणि टिळेकर यांची मामी हिने दिल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

मोहिनी सतीश वाघ Mohini Satish Wagh (वय ५३) हिला गुन्हे शाखेने बुधवारी सायंकाळी अटक केली आहे. प्रेम प्रकरणातून सुपारी देऊन सतीश वाघ यांचा खुन करण्यात आल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे.

याबाबत पोलिसांनी सांगितले की, मोहिनी आणि अक्षय जवळकर यांच्या अनैतिक संबंध होते. अक्षय जवळकर हा त्यांचा भाडेकरु होता. त्यांच्यात वाद झाल्याने अक्षय याने खोली सोडली होती. अक्षय आणि मोहिनी यांच्यात अनैतिक संबंध होते. त्यातूनच मोहिनी हिने अक्षयला सुपारी दिली होती. पोलीस तपासात हे स्पष्ट झाल्यानंतर बुधवारी सायंकाळी पोलिसांनी मोहिनी वाघ हिला अटक केली आहे. सतीश वाघ खुन प्रकरणात आतापर्यंत सहा जणांना अटक करण्यात आली आहे.

सतीश वाघ यांच्या खुन प्रकरणात पोलिसांनी यापूर्वी पवन शर्मा (वय ३०), नवनाथ गुरसाळे (वय ३१), विक्की शिंदे (वय २८) आणि
सोन्या ऊर्फ अक्षय जावळकर (वय २९) आणि आतिश जाधव यांना अटक केली आहे. (Satish Wagh Murder Case)

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Goyal Properties Pune | राष्ट्रीय ग्राहक संरक्षण आयोगाचा गोयल प्रॉपर्टीज या बांधकाम कंपनीला दणका,
घर खरेदीदारांना दोन महिन्यात रक्कम सव्याज परत करण्याचे आदेश

Shivaji Road Pune Accident News | मद्यधुंद कारचालकाची अनेक वाहनांना धडक;
लोकांनी पकडून दिले पोलिसांच्या ताब्यात (Video)

You may have missed