Sawai Gandharva Bhimsen Mahotsav | सवाई गंधर्व संगीत महोत्सवासाठी २१ डिसेंबर रोजी रात्री बारा वाजेपर्यंत ध्वनीक्षेपक वापरास परवानगी
पुणे : Sawai Gandharva Bhimsen Mahotsav | पुणे शहरात १८ ते २२ डिसेंबर या कालावधीत आयोजित ७० व्या सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवासाठी २१ डिसेंबर २०२४ रोजी सकाळी ६ वाजल्यापासून ते रात्री १२ वाजेपर्यंत ध्वनीक्षेपक व ध्वनीवर्धक यंत्रणेचा वापर करण्यास जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे (Suhad Diwase) यांच्या आदेशानुसार परवानगी देण्यात आली आहे.
पुणे जिल्ह्यासाठी ध्वनीक्षेपक व ध्वनीवर्धक वापरासाठी सवलतीचे १५ दिवस निश्चित करण्यात आले आहेत. त्यापैकी १३ दिवस यापूर्वीच सवलत देण्यात आली असून शिल्लक राहिलेल्या २ दिवसातून १ दिवस आर्य संगीत प्रसारक मंडळाच्या विनंतीवरून २१ डिसेंबर रोजी ध्वनीक्षेपक व ध्वनीवर्धक यंत्रणेचा वापर करण्यास परवानगी देण्यात येत आहे.
ध्वनी प्रदुषण नियम २००० आणि ध्वनी प्रदूषण (नियमन व नियंत्रण) सुधारित नियम २०१७ मधील तरतुदींचे पालन करण्यात यावे. ध्वनीची विहित मर्यादा राखून ध्वनीक्षेपक व ध्वनीवर्धक यंत्रणेचा वापर करावा. ध्वनीचे शोषण करणारे विशिष्ट लाकडी सामुग्री आवश्यक त्या ठिकाणी लावावी. क्षेत्राप्रमाणे (झोनींग) ठरलेल्या मर्यादेपेक्षा जास्त आवाज ठेऊ नये तसेच शांतता क्षेत्रात ही सूट लागू नसल्याचे आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/
Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
FIR On PMC Officers In Pune | पुणे महापालिका उपायुक्तासह शिक्षणाधिकारी, लिपिकांवर गुन्हा दाखल !
बनावट डिग्रीची मार्कलिस्ट तयार करुन महापालिकेची फसवणूक, आणखी पाच अधिकाऱ्यांच्या डिग्रीविषयी संशय
Maharashtra Assembly Election 2024 | ‘शरद पवार, ठाकरेंनी मनोज जरांगेंशी बोलायला सांगितलं’,
ऍड.असिम सरोदेंचा मोठा गौप्यस्फोट; म्हणाले – ” जरांगेंच्या भेटीत विधानसभेला उमेदवार न देण्याबाबत चर्चा…”
Devendra Fadnavis On Sharad Pawar | देवेंद्र फडणवीसांचा मोठा गौप्यस्फोट; म्हणाले –
“शरद पवारांच्या ‘त्या’ पत्रामुळेच 2019 मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली”