School Bus Accident In Pune | आळंदी-मरकळ रोडवरील इंद्रायणी नदी पुलावर स्कूल बसचा अपघात, 70 शाळकरी मुले थोडक्यात बचावली

School Bus Accident In Pune

पिंपरी : School Bus Accident In Pune | आळंदी-मरकळ रोडवरील (Alandi Markal Road) इंद्रायणी नदीच्या पुलावर (Indrayani River Bridge) एका स्कूल बसचा अपघात झाला. स्कूल बस चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस पुलाचा कठडा तोडून पुढे गेली. मात्र, चऱ्होली येथील ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे 70 शाळकरी मुलांचा जीव वाचला. ही घटना गुरुवारी (दि.4) दुपारी पावणे चार वाजण्याच्या सुमारास दाभाडे सरकार चौकात घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी दुपारी पावणे चार वाजण्याच्या सुमारास लोकसेवा इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजची (Lokseva English Medium School) स्कूल बस आळंदी-मरकळ रोडने शाळकरी मुलांना घेऊन जात होती. चऱ्होली येथील दाभाडे सरकार चौकाजवळ इंद्रायणी नदीवर बस आल्यानंतर बस चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले. त्यामुळे बसने पुलाचा ठकडा तोडून पुढे गेली. अर्धी बस पुलाच्या बाहेर गेली. त्यावेळी बसमध्ये 70 विद्यार्थी होते. (School Bus Accident In Pune)

तुषार दाभाडे, सुशील निगडे, विष्णू तापकीर, संकेत तापकीर, सागर दाभाडे, सुरज दाभाडे,
ओंकार भुजबळ, सुनील गावडे यांनी स्कूल बसच्या काचा फोडून विद्यार्थ्यांना बाहेर काढले.
या अपघातामुळे या मार्गावर वाहतूक कोंडी झाली.
पिंपरी चिंचवड महापालिकेचे माजी महापौर नितीन काळजे यांनी घटनास्थळी येऊन क्रेनच्या सहाय्याने बस बाजूला काढली.
सध्या पावसाचे दिवस असून इंद्रायणी नदीला पाणी आले आहे. स्थानिकांनी वेळीच सतर्कता दाखवल्याने मोठी दुर्घटना टळली आहे.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Ajit Pawar | “माझा दोष फक्त इतकाच आहे की…” अजित पवारांनी जारी केला व्हिडिओ संदेश; जाणून घ्या

Mahavikas Aghadi | ‘आघाडी सरकार आले, तर महिलांना एक लाख’; पृथ्वीराज चव्हाणांनी केलं जाहीर

Supriya Sule On Ajit Pawar Video | अजित पवारांच्या व्हिडिओवर सुप्रिया सुळेंकडून प्रत्युत्तर; म्हणाल्या, “अजित पवारांच्या आरोपांवर…”