School Close In Pimpri | पिंपरी-चिंचवड महानगरपालिका स्पर्धामार्गावरील शाळा 23 जानेवारी रोजी दुपारी 12 वाजेनंतर बंद करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश जारी

Schools Closed

पुणे  : School Close In Pimpri |  पुणे ग्रँड चॅलेंज टूर-२०२६ आंतरराष्ट्रीय सायकलिंग स्पर्धेच्या अनुषंगाने चौथ्या टप्प्याच्याअनुषंगाने पिंपरी-चिंचवड  महानगरपालिकेच्या हद्दीतील स्पर्धा मार्गावरील सर्व सरकारी व खाजगी शाळा २३ जानेवारी रोजी दुपारी १२ वाजेपर्यंत सुरु ठेवाव्यात; त्यांनतर शाळा बंद करण्याचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष जितेंद्र डूडी यांनी जारी केले आहेत.

टप्पा क्रमांक चार अंतर्गत छत्रपती शिवाजी स्टेडियम, बालेवाडी येथून स्पर्धेला सुरुवात होणार असून  ती पुणे शहरहद्दीत जावून परत राजीव गांधी ब्रिजमार्गे पिंपरी चिंचवड आयुक्तालयाच्या हद्दीत प्रवेश करणार करुन ती सागवी, वाकड, निगडी, त्रिवणीनगर, भोसरी, चिखली, पिंपरी काळेवाडी परिसरातून फिरुन परत राजीव गांधी ब्रिज मार्गे पुणे शहर हद्दीत प्रवेश करणार आहे. ही स्पर्धा सुरळीत व सुरक्षितपणे पार पडणेकरीता तसेच नागरिकांची होणारी गैरसोय टाळणेकरिता स्पर्धा मार्गावर सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश करण्यास मनाई करण्यात आलेली असून वाहतूक पर्यायी मार्गान वळविण्यात आलेली आहे.

विद्यार्थ्यांची होणारी गैरसोय टाळण्याकरीता स्पर्धा मार्गावरील सांगवी, वाकड, रावेत, ताथवडे, पुनावळे, निगडी प्राधिकरण, इंद्रायणीनगर, चिंचवड एम.आय.डी.सी, चिखली, काळेवाडी, भोसरी एम.आय.डी.सी., यशवंतनगर पिपरी, त्रिवेणीनगर या परिसरातील सर्व शासकीय व खाजगी शाळा दुपारी १२ वाजेनंतर बंद करण्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे.

You may have missed