Search Operation In Sharayu Motors Baramati | राजकीय वातावरण तापलं! श्रीनिवास पवार यांच्या शरयू मोटर्सवर छापा, बारामतीत खळबळ
बारामती: Search Operation In Sharayu Motors Baramati | विधानसभा निवडणुकीच्या (Maharashtra Assembly Election 2024) पार्श्वभूमीवर बारामतीमधील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. असे असतानाच ‘शरयू मोटर्स’ मध्ये पोलिसांनी रात्री सर्च ऑपरेशन केल्याने तर्कवितर्क लावले जात आहेत. या कंपनीचे मालक उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांचे धाकटे बंधू श्रीनिवास पवार (Shreeniwas Pawar) आहेत. श्रीनिवास पवार यांचे पुत्र युगेंद्र पवार (Yugendra Pawar) हे राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून (Sharad Pawar NCP) अजित पवारांविरोधात बारामती मतदारसंघातून (Baramati Assembly) विधानसभेची निवडणूक लढवत आहेत.
श्रीनिवास पवार हे बारामतीत प्रस्थापित उद्योजक आहेत. श्रीनिवास पवार यांच्या मालकीच्या शरयू मोटर्समध्ये रात्री पोलिसांनी अचानक सर्च ऑपरेशन केले. मात्र, तपासादरम्यान काहीही संशयास्पद सापडले नसल्याची माहिती आहे.
रात्रीच्या वेळेस, बारामती पोलिसांनी श्रीनिवास पवार यांच्या शरयू मोटर्स वर छापा मारला. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हे सर्च ऑपरेशन झाल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे. मात्र, तपासादरम्यान कोणतेही अवैध साहित्य किंवा आर्थिक व्यवहार आढळले नाहीत.
युगेंद्र पवार म्हणाले, ” मला याची माहिती नव्हती पण मला आता माहिती मिळाली.
मी पहिल्यांदा निवडणूक लढवत आहे. तो आमचा एक व्यवसाय आहे. तिथे काहीही नसते.
आम्ही कधी चुकीचे कामे केली नाही आणि करणार देखील नाही. आम्ही कायदा पाळणारे लोक आहोत. त्यामुळे कायद्याने या गोष्टीला सामोरे जाऊ”, असे युगेंद्र पवार यांनी म्हंटले आहे.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/
Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Pune Police Tadipari Action | येरवडा परिसरातील 4 सराईत गुन्हेगार तडीपार ! पोलीस उपायुक्त हिंमत जाधव यांनी केली कारवाई
Maharashtra Assembly Election 2024 | दहा हजाराहून अधिक मतदार असलेल्या मतदान केंद्र इमारतींच्या ठिकाणी वाहन तळासाठी अतिरिक्त क्षेत्र उपलब्ध