Shankar Jagtap – Sandeep Kaspate | चिंचवड भाजपमधील गटबाजीला उधाण; शहराध्यक्ष शंकर जगतापांच्या कार्यपद्धतीवर आक्षेप घेत माजी नगरसेवकाची पक्षाला सोडचिठ्ठी

Sandeep Kaspate

पिंपरी : Shankar Jagtap – Sandeep Kaspate | गेल्या काही दिवसांपासून पिंपरी-चिंचवड शहर भाजपमधील (Pimpri Chinchwad BJP) गटबाजीला उधाण आले आहे. दरम्यान शहराध्यक्ष शंकर जगताप यांच्या कार्यपद्धतीवर आक्षेप घेत पिंपळे निलख परिसराचे माजी नगरसेवक संदीप कस्पटे यांनी भाजपच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. (Former Corporator Sandeep Kaspate Quits BJP)

पालिकेच्या २०१७ च्या निवडणुकीत पिंपळे निलख (Pimple Nilakh), वाकड प्रभागातून कस्पटे हे भाजपच्या चिन्हावर पहिल्यांदा विजयी झाले. गेल्या काही दिवसांपासून ते नाराज होते. शहराध्यक्ष शंकर जगताप यांच्या कार्यपद्धतीवर त्यांचा आक्षेप होता. अखेरीस त्यांनी राजीनामा दिला आहे.

चिंचवड विधानसभा (Chinchwad Assembly) क्षेत्रात पक्षात लोकशाही नसून केवळ घराणेशाही असल्याचा आरोप त्यांनी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना पाठविलेल्या पत्रात केला आहे. निष्ठावंत कार्यकर्त्यांना जबाबदारी द्यायचे सोडून सापत्न वागणूक दिली जात आहे.

ताकतवर कार्यकर्त्यांचे खच्चीकरण केले जाते. पोटनिवडणुकीत अश्विनी जगताप (Ashwini Jagtap) यांच्यासाठी कार्यकर्त्यांनी जीवाचे रान करून प्रभागात मताधिक्य दिले,असे त्यांनी म्हंटले आहे.

माझ्यासारखे अनेक माजी नगरसेवक घराणेशाहीला, हुकुमशाहीला कंटाळले आहेत.
आणखी १५ माजी नगरसेवक राजीनामा देण्याच्या तयारीत असल्याचे कस्पटे यांनी पत्रात म्हटले आहे.
गेल्या काही दिवसांपासून पिंपरी-चिंचवड शहर भाजपमधील गटबाजीला उधाण आले आहे. (Shankar Jagtap – Sandeep Kaspate)

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Chandrakant Patil Convoy Car Accident | मद्यपी चालकाची ताफ्यातील गाडीला धडक; मंत्री चंद्रकांत पाटील थोडक्यात बचावले

Punit Balan – Bhau Rangari Ganpati | बाप्पा माझे गुरू, कुटुंबातील सदस्य ! बाप्पाला निरोप देताना पुनीत बालन भावूक (Video)

Sangvi Pune Crime News | सांगवीत गाड्या फोडताना पाहिल्याने गतीमंद तरुणावर कोयत्याने वार करुन केला खुनाचा प्रयत्न

Mahayuti Seat Sharing Formula | महायुतीचा जागावाटपाचा पेच संपला 80 नाही 90 नाही; बावनकुळेंनी सांगितला नवा फॉर्म्युला

You may have missed