Shankaracharya Avimukteshwaranand | केदारनाथ मधून 228 किलो सोने गायब; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांचा गंभीर आरोप

Shankaracharya Avimukteshwaranand

दिल्ली : Shankaracharya Avimukteshwaranand | दिल्लीमध्ये केदारनाथ मंदिराची पायाभरणी करण्यावरून वादाला तोंड फुटलं आहे. एकीकडे केदारनाथ मंदिराच्या पुजाऱ्यांकडून याला विरोध होत असतानाच ज्योतिर्मठाचे शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांनीही दिल्लीत केदारनाथ मंदिर उभारण्यास विरोध केला आहे. तसेच केदारनाथ येथील मंदिराच्या गाभाऱ्याला सोन्याचा मुलामा देण्याच्या कामात मोठा घोटाळा झाल्याचा आरोप केला आहे. केदारनाथ मंदिराकडून २२८ किलो सोनं गायब झालं आहे त्याचा हिशोब कोण देणार? असा आरोप शंकराचार्यांनी केला आहे.

शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांनी सांगितले की, केदारनाथमध्ये सोन्याचा घोटाळा झाला आहे तो मुद्दा उपस्थित का करण्यात आला नाही? तिथे घोटाळा केल्यानंतर आता दिल्लीत केदारनाथ मंदिर बांधलं जाईल, तिथे पुन्हा एकदा घोटाळा होईल असा आरोप त्यांनी केला.

मागच्या वर्षी केदारनाथ मंदिरातील एक वरिष्ठ पुजाऱ्याने केदारनाथ मंदिरामध्ये सोन्याचा मुलामा लावण्याच्या कामामध्ये १२५ कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप केला होता. तसेच या कामात सोन्याऐवजी पितळीचा मुलामा दिल्याचा आरोप करण्यात आला होता. मात्र मंदिर समितीने हा आरोप फेटाळून लावला होता.

याबाबत शंकराचार्य म्हणाले की, केदारनाथमध्ये २२८ किलो सोनं गायब आहे. कुठलाही तपास झालेला नाही. त्यासाठी कोण जबाबदार आहे? आता ते म्हणत आहेत की दिल्लीमध्ये केदारनाथ मंदिर बनवणार आहोत. हे होणार नाही.

दरम्यान, उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी बुधवारी दिल्लीमधील उत्तर पश्चिममध्ये असलेल्या हिरांकी परिसरात नव्या केदारनाथ मंदिराचं भूमीपूजन केले. मात्र त्याला रुद्रप्रयाग येथील केदारनाथ मंदिरातील पूजाऱ्यांनी विरोध केला आहे. तसेच त्यांनी उत्तराखंडच्या मुख्यमंत्र्यांविरोधात घोषणाबाजी केली होती. (Shankaracharya Avimukteshwaranand)

याबाबत केदारनाथ सभेचे प्रवक्ते पंकज शुक्ल यांनी आपली भूमिका स्पष्ट करताना सांगितले की, आम्ही मंदिर बांधण्याविरोधात नाहीत. तर दिल्लीमध्ये एका धार्मिक ट्रस्टकडून केदारनाथ मंदिराची उभारणी करण्याच्या विरोधात आहोत. केदारनाथ क्षेत्रातून एक दगड जरी स्थानांतरीत केला गेला तरी केदारनाथ मंदिराचं पावित्र्य कमी होईल, असा दावा त्यांनी केला आहे.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Chinchwad Assembly Constituency | चिंचवड विधानसभा मतदारसंघात इच्छुकांची संख्या वाढल्याने भाजपची डोकेदुखी वाढणार; शत्रुघ्न काटेंचे शक्तिप्रदर्शन

Pune Monsoon Rain | पुणे जिल्ह्याला पावसाचा ऑरेंज अलर्ट; पावसाचा जोर वाढण्याची शक्यता

Yerawada Jail News | येरवडा कारागृहातून जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेला कैदी फरार

You may have missed