Sharad Pawar – CM Eknath Shinde | विरोधकांच्या कारखान्याबाबत दुजाभाव; शरद पवारांनी वेधले मुख्यमंत्र्यांचे लक्ष

sharad pawar eknath shinde

मुंबई : Sharad Pawar – CM Eknath Shinde | शरद पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सह्याद्री अतिथीगृह येथे भेट घेऊन विरोधी पक्षाच्या नेते आणि आमदारांवर अन्याय होत असल्याकडे शिंदे यांचे लक्ष वेधले. विरोधी पक्षाच्या कारखान्यांना हमी न देण्याचे धोरण राज्य सरकारने अवलंबले आहे त्याबाबत विचार व्हावा तसेच दूध उत्पादकांबाबत प्रश्न उपस्थित करत ते सोडवण्याची मागणी पवार यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

दूध दरप्रश्नी उत्पादक शेतकरी संघर्ष समितीतर्फे संगमनेर येथून आंदोलनाला सुरुवात होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर पवार यांच्या नेतृत्वाखाली समितीच्या शिष्टमंडळानेही मुख्यमंत्र्यांची भेट घेतली.

साखर कारखान्यांच्या कर्जाला थकहमी देण्याबाबत महायुती सरकारकडून दुजाभाव केला जात आहे. राजकीय अभिनिवेश बाजूला ठेवून शेतकऱ्यांच्या हितासाठी या कारखान्यांना मदत करा. या प्रकरणात हस्तक्षेप करा, अशी मागणी पवार यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे या भेटीत केल्याचे व मुख्यमंत्र्यांनीही याबाबत सकारात्मकता दर्शवल्याचे समजते. (Sharad Pawar – CM Eknath Shinde)

सहकार खाते अजित पवार गटाकडे असल्याने कुणाच्या कारखान्याचे थकहमीचे प्रस्ताव पाठवायचे
यात हस्तक्षेप होत असल्याचा आरोप कारखानदार करत आहेत.
राज्यातील ज्या १३ कारखान्यांच्या कर्जाला थकहमी दिली त्यात काँग्रेसचे आमदार संग्राम थोपटे
यांच्या राजगड सहकारी साखर कारखान्याचा समावेश असल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

तसेच दुसरी यादी ‘एनसीडीसी’ कडे पाठविणार आहे.
या यादीत पुन्हा सत्ताधारी नेत्यांच्या कारखान्यांचा समावेश करण्यात आला आहे.
त्यामुळे शरद पवार यांच्याकडे समर्थक आमदारांनी तक्रारी केल्या होत्या.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Puja Khedkar | UPSC ने गुन्हा दाखल करताच पूजा खेडकर नॉट रिचेबल; पुणे पोलिसांनी समन्स बजावूनही उपस्थित नाहीत

Pune Crime News | आंदेकर टोळीतील गुंडांकडून तरुणावर हल्ला; एकास अटक

Sassoon Hospital | धक्कादायक! ससून रुग्णालयातील डॉक्टरांकडून बेवारस रुग्णासोबत अमानवी कृत्य

You may have missed