Sharad Pawar-criticizes Mahayuti Govt | महायुती सरकारच्या योजनांवरून शरद पवारांचा निशाणा; म्हणाले – ‘… तेव्हाच बहीण-भाऊ आठवतात’

sharad pawar eknath shinde

पुणे : Sharad Pawar-criticizes Mahayuti Govt | आगामी विधानसभा निवडणुकीच्या (Maharashtra Assembly Election 2024) धर्तीवर महायुती सरकारने अधिवेशनात (Maharashtra Monsoon Session) अनेक योजनांची घोषणा केली. त्यातील मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना (Majhi Ladki Bahin Yojana), आणि लाडका भाऊ (Ladka Bhau Yojana) योजनेची जोरदार चर्चा सुरु आहे. सरकारी तिजोरीत पैसे नसताना अशा योजना जाहीर केल्याचे विरोधकांचे म्हणणे आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेंतर्गत महिलांना दरमहा दीड हजार रुपये दिले जाणार आहेत.

तर लाडका भाऊ योजनेच्या अंतर्गत बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना दरमहा सहा हजार रुपये देण्यात येणार आहेत, तर डिप्लोमा केलेल्या विद्यार्थ्यांना आठ हजार रुपये तसेच पदवीधर तरुणांना १० हजार रुपये स्टायपंड देण्यात येणार आहे. यावरून पुण्यात पत्रकारांशी बोलताना शरद पवार यांनी राज्य आर्थिकदृष्ट्या सावरलं पाहिजे, असे म्हंटले आहे.

शरद पवार म्हणाले, ” या अर्थसंकल्पात आपण लाडकी बहीण, लाडका भाऊ योजना पाहिल्या. अर्थसंकल्प दरवर्षी मांडला जातो. महाराष्ट्रात जयंत पाटील आणि अजित पवार या दोघांनाच सर्वाधिक वेळा अर्थसंकल्प मांडण्याची संधी मिळाली. त्या सहा सात वेळा बहीण भाऊ कुठे आलेले दिसले नाहीत.

बहीण भावांचा विचार होतोय ही चांगली गोष्ट आहे. हा सगळा चमत्कार लोकसभेच्या मतांचा आहे.
मतदारांनी मते व्यवस्थित दिली की बहीण भाऊ सगळ्यांची आठवण होते. त्याच्याविषयी मला काळजी एकच आहे
की, महाराष्ट्राची एकंदरीत स्थिती काय आहे? एक काळ असा होता की महाराष्ट्र देशातल्या दोन तीन राज्यांमध्ये होता.
परवा नियोजन मंडळाने जी यादी प्रसिद्ध केली त्यात महाराष्ट्राचा क्रमांक ११ वा आहे.
आपण ११ व्या क्रमांकावर जाऊन पोहोचलो आहे. हे चिंता करण्यासारखे आहे.

अंदाचे ६० ते ८० हजार कोटींचे कर्ज महाराष्ट्राच्या डोक्यावर आहे.
तूट २० हजार कोटींपेक्षा जास्त आहे. अर्थसंकल्प मांडल्याच्या आठवड्यातच पुरवणी मागण्या मांडल्या.
लोकसभा निवडणुकीचा निकाल पाहून ही उचललेली पावले आहेत.
राज्य आर्थिकदृष्ट्या सावरलं पाहिजे,”असे शरद पवार यांनी सांगितलं.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

MLA Sunil Tingre | वडगाव शेरी, धानोरी भागातील पूरग्रस्तांचे सर्व्हेक्षण करुन नुकसान भरपाई देणार;
आमदार सुनिल टिंगरे यांच्या लक्षवेधीवर मंत्री उदय सामंत यांचे आश्वासन

Pune Crime News | पुणे: येरवड्यात पूर्ववैमनस्यातून सराईत गुन्हेगाराची ‘गेम’; कोयत्याने वार करुन खून करणाऱ्या तिघांना अटक

Eknath Shinde – Ashadhi Ekadashi | ‘पुढच्या वर्षी मीच मुख्यमंत्री म्हणून येणार की नाही… ‘ – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

You may have missed