Sharad Pawar Invite Madhukar Pichad | भाजपवासी मधुकर पिचड यांना परतीची साद; शरद पवारांचा मोठा डाव
पुणे : Sharad Pawar Invite Madhukar Pichad | माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील (Vijaysinh Mohite–Patil) यांचे कुटुंबीय तसेच मधुकर पिचड आणि त्यांच्या कुटुंबीयांनी शरद पवार यांना सोडचिठ्ठी देऊन भाजपमध्ये (BJP) प्रवेश केला होता. मोहिते पाटील आणि पिचड एकेकाळी पवार यांचे कट्टर समर्थक समजले जात होते. असे असताना त्यांनी पवार यांची सोडलेली साथ चर्चेचा विषय होता.
यंदाच्या लोकसभा निवडणुकीत शरद पवार यांनी मोहिते पाटील कुटुंबाला पुन्हा आपलंसं करत माढा लोकसभेची जागा जिंकून दाखवली. त्यानंतर शरद पवार आता आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टिकोनातून मोर्चेबांधणी करत आहेत. भाजपवासी झालेल्या मधुकर पिचड यांना परतीची साद घालत शरद पवार मोठा डाव टाकण्याच्या तयारीत आहेत. माजी मंत्री व आदिवासी समाजातील ज्येष्ठ नेते मुधकर पिचड यांना पक्षात घेण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. (Sharad Pawar Invite Madhukar Pichad)
मधुकर पिचड आणि त्यांचे चिंरजीव माजी आमदार वैभव यांनी सन २०१९ मध्ये भारतीय जनता पक्षात प्रवेश केला होता. त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत वैभव यांचा पराभव झाला आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे डॉ. किरण लहामटे यांचा विजय झाला होता. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गेल्या वर्षी महायुतीत सहभागी होण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर लहामटेही अजित पवार यांच्यासमवेत महायुतीमध्ये सामील झाले. (Maharashtra Assembly Election 2024)
आगामी निवडणुकीत लहामटे हे ‘महायुती’चे (Mahayuti) उमेदवार राहण्याची दाट शक्यता असल्याने पवार यांनी ‘अकोल्या’त मोर्चेबांधणी सुरू केली आहे.
या पार्श्वभूमीवर मोहिते पाटील यांच्यानंतर पिचड यांच्याशी चर्चा झाल्या असून,
त्यांना ‘राष्ट्रवादी’त घेण्याची तयारी सुरू असल्याची कुजबूज राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
ACB Trap On Policeman (ASI) | लाच घेताना सहायक पोलीस उपनिरीक्षक अॅन्टी करप्शनच्या जाळ्यात
Pune Crime News | पुणे: खुन्नस दिल्याच्या रागातून तरुणावर हल्ला, दहशत पसरवणाऱ्या आरोपीला अटक