Sharad Pawar Nagar Sabha | ‘थांबायचं नाही, सत्ता हातात आल्याशिवाय राहत नाही’; नगरच्या सभेतून शरद पवारांनी तुतारी फुंकली
नगर : Sharad Pawar Nagar Sabha | आगामी विधानसभा निवडणूक (Maharashtra Assembly Election 2024) डोळ्यासमोर ठेऊन शरद पवार यांनी मोर्चेबांधणी सुरु केलेली आहे. लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha Election 2024) शरद पवार गटाचे १० पैकी ८ खासदार निवडून आलेले आहेत. त्यामुळे पक्षाचा आत्मविश्वास वाढलेला आहे. शरद पवार आज अहमदनगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी बोलताना पवारांनी आगामी विधानसभा निवडणुकीबाबत भाष्य केले आहे.
शरद पवार म्हणाले, ” “आजच्या राज्यकर्त्यांना शेती आणि शेतकरी यांची आस्था नाही. आता तुमची आमची जबाबदारी आहे. लोकसभेत तुम्ही उत्तम काम केलंय. पाच वर्षापूर्वी कॉग्रेसला एक आणि राष्ट्रवादीला चार जागा मिळाल्या होत्या. या निवडणुकीत 48 पैकी 31 जागा जिंकल्या याचा अभिमान आहे,” असे शरद पवार म्हणाले.
“लोकसभेने एक नवी दिशा देशाला दाखवली आहे. सत्तर दिवसांनी विधानसभेची निवडणूक आहे. आता तयारीला लागा. तुम्ही सर्व एकत्र असाल तर कुणीही धक्का लावू शकत नाही, सत्ता तुमच्या हातात आल्याशिवाय राहत नाही, आता काही मागायचं नाही ठरवलंय. तुम्ही मला अनेकदा निवडून दिलंय, आता फक्त महाराष्ट्रात सर्वसामान्यांच्या हिताचं सरकार आणायचं आहे. ते आणण्यासाठी तुमची शक्ती हवीय’ असे म्हणत शरद पवार यांनी विधानसभेचे रणशिंग फुंकले आहे.
अकोले येथे शरद पवार यांच्या उपस्थितीत शेतकरी मेळावा पार पडला.
त्यावेळी शरद पवार यांनी आपली ही भूमिका स्पष्ट केली.
यावेळी खासदार निलेश लंके (Nilesh Lanke), भाऊसाहेब वाकचौरे (Bhausaheb Waghchaure) आदी नेते उपस्थित होते.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Manorama Khedkar | मनोरमा खेडकरची पिंपरी-चिंचवड येथील कंपनी होणार जप्त; खेडकरांचा पाय आणखी खोलात
Pune Crime News | पुणे: घरात घुसून महिलेसमोर अश्लील हावभाव, तरुणाला अटक