Sharad Pawar NCP | ‘ज्यांनी आमचं काम केलं ते आमचे’ अजित पवार गटाचे आमदार अतुल बेनके यांच्या भेटीनंतर शरद पवारांचे सूचक वक्तव्य चर्चेत

Sharad Pawar

पुणे : Sharad Pawar NCP | शरद पवार उत्तर पुणे जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. दरम्यान शरद पवार यांनी खासदार अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. यावेळी त्याठिकाणी भेट घेण्यासाठी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे (Ajit Pawar NCP) आमदार अतुल बेनके (MLA Atul Benke) ही उपस्थित होते. यावेळी बेनके यांनी भेट घेत शरद पवार यांच्यासोबत चर्चाही केली. त्यामुळे राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

अतुल बेनके हे जुन्नर विधानसभा मतदारसंघाचे (Junnar Assembly Constituency) आमदार आहेत. ‘लोकसभा निवडणुकीमध्ये ज्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी ज्यांनी काम केलं ते आमचे. ज्यांनी आमच्यासाठी काम केलं ते आमचे होतील. त्यांच्या हिताची जपवणूक करण्याची जबाबदारी आमची असेल’, असे सूचक वक्तव्य शरद पवार यांनी केलं आहे. आम्ही लोकसभेला १० जागा लढल्या त्यातील ८ जागा जिंकल्या. त्यामुळे स्ट्राईक रेट नुसार आम्ही एक क्रमांकाचा पक्ष आहोत असेदेखील पवार म्हणाले.

आगामी विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन राष्ट्रवादी शरद पवार गटाने मोर्चेबांधणी सुरु केलेली आहे. अजित पवार गटातील अनेक पदाधिकारी शरद पवार गटात प्रवेश करताना दिसत आहेत. मागेच पिंपरी चिंचवड (Pimpri Chinchwad) शहराध्यक्ष अजित गव्हाणे (Ajit Gavhane) यांनी अजित पवार यांची साथ सोडत इतर पदाधिकाऱ्यांसह राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश केला. त्यानंतर आता आमदार अतुल बेनके यांनी शरद पवारांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Pipani Symbol Freeze | निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय; शरद पवार गटाला दिलासा; विरोधकांची ‘पिपाणी’ वाजणे ‘बंद’

Manorama Khedkar | मनोरमा खेडकरची पिंपरी-चिंचवड येथील कंपनी होणार जप्त; खेडकरांचा पाय आणखी खोलात

PMC Solid Waste Management | घनकचरा विभागाच्या मनमानीला वरिष्ठांचा लगाम; मर्जीतील ठेकेदार पात्र ठरणार नसल्याने घनकचरा विभागात ‘अस्वस्थता’

Pune Crime News | पुणे: घरात घुसून महिलेसमोर अश्लील हावभाव, तरुणाला अटक

You may have missed