Sharad Pawar | ‘एकदा राज्य हातामध्ये द्या, मग महाराष्ट्राचा…’, शरद पवारांचे धुळ्यात आवाहन; म्हणाले,”हे सरकार बहिणींना 1500 देते पण त्यांची अब्रू…”

Sharad Pawar

धुळे : Sharad Pawar | विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला आहे. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हेदेखील विविध बैठका आणि सभांमध्ये सहभागी होऊन महायुती सरकारवर (Mahayuti Govt) निशाणा साधत आहेत. धुळ्यात बोलताना पवारांनी लाडकी बहीण योजनेवरून (Ladki Bahin Yojana) सरकारवर टीका केली आहे. (Maharashtra Assembly Election 2024)

धुळ्यातील शिंदखेडा येथे शेतकरी मेळावा पार पडला (Shindkheda Shetkari Melava). यावेळी बोलताना सध्याच्या सरकारला आस्था नाही. मी तुम्हाला शब्द देतो. एकदा राज्य हातामध्ये द्या. मग महाराष्ट्राचा चेहरामोहरा बदलल्याशिवाय राहणार नाही, असे शरद पवार यांनी म्हंटले आहे.

शरद पवार म्हणाले, ” राज्यात आता गुंडगिरीचे राज्य सुरु झाले आहे. सत्तेचा गैरवापर सुरु झाला आहे. ना कारखाने, ना सहकार चळवळीसाठी या सरकारने काम केले. रोजगार दिला नाही. गेल्या २० वर्षांत काहीच विकास झाला नाही. हे सरकार बहिणींना १५०० हजार रुपये देणार आहे. पण बहिणींची अब्रू वाचविण्याची गरज आहे.

बहिणींचा सन्मान राखला जावा. त्याकडे सरकारचे लक्ष नाही. सत्तेचा माज या लोकांच्या डोक्यात शिरला आहे. त्यांच्याकडून सत्तेचा गैरवापर सुरु आहे. बाबासाहेबांनी लोकशाहीचा अधिकार आपणास दिला आहे. पण या लोकांना सत्तेचा उन्माद चढला आहे. त्यांना आता खड्यासारखे बाजूला काढा. या निवडणुकीत ती संधी तुम्हाला आहे”, असं शरद पवार म्हणाले.

“आज हाच तालुका कष्टकरी आणि शेतकऱ्यांचा तालुका आहे. पण आता काय दिसत आहे? सत्तेचा गैरवापर सुरु झाला. गुंडगिरी सुरु झाली. खोटे गुन्हे दाखल करण्यात येऊ लागले आहेत. दमदाटी करण्याचे प्रकार वाढले. लोकांना तुरुंगात टाकण्याचे प्रकार होऊ लागले.

मात्र, सत्ता ही लोकांच्या कामांसाठी असते. पण काही लोकांकडे सत्ता हातात आल्यानंतर सत्ता डोक्यात शिरते आणि सत्तेचा गैरवापर होतो.
सध्या राज्याची सत्ता चुकीच्या लोकांच्या हातामध्ये आहे.
ती सत्ता उद्या संधी मिळाल्यानंतर त्यांच्या हातातून काढून घेणं आणि महाविकास आघाडीच्या हातात देणं हे काम तुम्हाला करायचं आहे.
मी तुम्हाला शब्द देतो. एकदा राज्य हातामध्ये द्या, मग महाराष्ट्राचा चेहरा बदलल्याशिवाय राहणार नाही”, असे आश्वासन पवारांनी दिले.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Vande Bharat Express | पुण्याच्या पहिल्या ‘वंदे भारत’चे सोमवारी लोकार्पण; केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ
यांची माहिती, सोमवारपासून पुणे-कोल्हापूर-हुबळी फेऱ्यांना सुरुवात

Mahayuti News | ‘महायुतीत स्थानिक पातळीवर अजूनही कार्यकर्त्यांची मनं जुळलेली नाहीत’,राष्ट्रवादीच्या
बड्या नेत्याचे वक्तव्य; म्हणाले – “ज्यांच्या बरोबर संघर्ष केला…”

Ajit Pawar At Narayanpur | उपमुख्यंत्री अजित पवार यांनी नारायणपूर येथे जाऊन वाहिली;
श्रीसदगुरु नारायण महाराजांना भावपूर्ण आदरांजली

You may have missed