Sharad Pawar NCP Group To Ajit Pawar | ‘अजित पवारांना खरंच पश्चात्ताप झाला असेल तर …’ शरद पवार गटाचे आवाहन; म्हणाले – ” त्यांचे हृदयपरिवर्तन झालेले पाहून आम्हाला आनंद”

Ajit Pawar

मुंबई : Sharad Pawar NCP Group To Ajit Pawar | राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची जनसन्मान यात्रा (Jan Sanman Yatra) गडचिरोली येथे असताना पक्षाचे आमदार आणि कॅबिनेट मंत्री धर्मरावबाबा आत्राम (Dharmrao Baba Atram) यांच्या कन्येने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून आगामी विधानसभा निवडणूक (Maharashtra Assembly Election 2024) लढविण्याच्या तयारीवर टीकाटिप्पणी झाली. आत्राम यांनी याविषयी कडाडून टीका करून त्याला विरोध केला.

त्यावर भाष्य करताना अजित पवार यांनी “वडिलांचं जितकं प्रेम आपल्या लेकीवर असतं. तेवढं लेकीवर प्रेम कुणीच करू शकत नाही. असं असताना तुम्ही घरामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहात, हे बरोबर नाही. समाजाला हे आवडत नाही. याचा अनुभव आम्ही पण घेतलेला आहे. साहेबांना सोडणं ही माझी मोठी चूक होती, मी हे मान्य केली आहे “, असे अजित पवारांनी सांगितले होते.

यावरून राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रवक्ते महेश तपासे (Mahesh Tapase) यांनी अजित पवारांवर निशाणा साधला आहे. ते म्हणाले, “अजित पवार यांना खरंच पश्चात्ताप झाला असेल आणि इतरांना ते राजकारणामुळे घरात फूट पडू देऊ नका, असे सल्ले देत असतील तर त्यांनी सर्वप्रथम शरद पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष त्यांना सुपूर्द केला पाहिजे.

वर्षानुवर्षे घडविलेले नेते, कार्यकर्ते अजित पवार यांनी पळवले.
अजित यांना खरेच मनापासून असे वाटत असेल तर त्यांनी कृतीतून ते दाखवून द्यावे,
अजित पवार यांचे हृदयपरिवर्तन झालेले पाहून आम्हाला आनंद झाला आहे; परंतु हे परिवर्तन कृतीत उतरणे महत्त्वाचे आहे”,
असे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी म्हंटले आहे. (Sharad Pawar NCP Group To Ajit Pawar)

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Pune Pimpri Chinchwad Crime News | डिलेव्हरी बॉईजचा राडा ! डिलेव्हरी बॉईजनी सुरक्षारक्षकाला केला जीवे मारण्याचा प्रयत्न (CCTV Video)

Maharashtra Assembly Election 2024 | शिवसेना आणि राष्ट्रवादीमुळे भाजपची गोची; नेत्यांची बंडखोरी रोखण्याचे आव्हान; डोकेदुखी वाढली

Shivaji Nagar Pune Crime News | बनावट 7/12 सादर करुन न्यायालयाची फसवणूक करणार्‍या महिलेवर गुन्हा दाखल

Pimpri Chinchwad Crime Branch News | पिस्तुल बाळगणार्‍या तरुणाला अटक ! गावठी कट्टा, 2 जिवंत काडतुसे जप्त

You may have missed