Sharad Pawar NCP | रोहित पवार भावी मुख्यमंत्री? शरद पवारांचे मोठे वक्तव्य; म्हणाले – ‘…महाराष्ट्राच्या इतिहासात नोंद होईल’

Sharad Pawar-Rohit Pawar

नगर : Sharad Pawar NCP | महाविकास आघाडीत (Mahavikas Aghadi) मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण? यावरून मतमतांतरे आहेत. तिन्ही पक्षातील नेते आपला नेताच मुख्यमंत्री पदाचा चेहरा असल्याचा दावा करीत आहे. दरम्यान आता शरद पवार यांनी केलेल्या विधानाने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

https://www.instagram.com/p/DAdvUuCidqN

शरद पवार अहमदनगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांच्या कर्जत जामखेड मतदार संघात (Karjat Jamkhed Assembly Constituency) खर्डा येथील शिवपट्टण किल्ला जतन व संवर्धन, वखार महामंडळ गोदाम बांधकाम, खर्डा जामखेड रस्ते कामाचे उद्घाटन शरद पवार तसेच खासदार शाहू महाराज छत्रपती यांच्या हस्ते पार पडले. यावेळी बोलताना शरद पवार यांनी त्यांच्या मुख्यमंत्रीपदाचा किस्सा सांगताना रोहित पवारांबाबत एक महत्वाचे विधान केले आहे.

https://www.instagram.com/p/DAdp0OCJhyt

“मी कधी मंत्री झालो नाही, पदाची अपेक्षा केली नाही. रोहितनेही कधी पक्षाकडे पदाची अपेक्षा केली नाही. मी सुद्धा पाच वर्षे मंत्री नव्हतो, पण आमदार म्हणून निवडून गेल्यानंतर मला सत्तेचे एक नाही तर दुसरे ठिकाण मिळत गेले.

https://www.instagram.com/p/DAdoApCJ8h8

मी गृहखात्याचा राज्यमंत्री झालो, कृषी खात्याचा, आणि नंतर वसंतदादांचे सरकार गेल्यानंतर मी स्वतःच मुख्यमंत्री झालो, एकदा नाही चार वेळा मुख्यमंत्री झालो, असे शरद पवार यांनी म्हंटले.

ते पुढे म्हणाले,” रोहितचीही पहिली पाच वर्षे तुमची सेवा करण्यासाठी आणि त्यानंतरची वर्षे महाराष्ट्राच्या सेवेसाठी. आणि ही महाराष्ट्राची सेवा महाराष्ट्राच्या इतिहासात नोंद होईल, अशा प्रकारची असेल”,असे सर्वात महत्वाचे विधान शरद पवार यांनी केले.

दरम्यान, शरद पवारांच्या या वक्तव्यानंतर आता राजकीय वर्तुळात उलट- सुलट चर्चा रंगू लागल्या आहेत.
शरद पवार यांचे हे विधान म्हणजे रोहित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाची तयारी तर नाही ना?
असा सवाल आता उपस्थित केला जात आहे. (Sharad Pawar NCP)

https://www.instagram.com/p/DAdi_yDpRi9

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Nirmala Sitharaman | अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्याविरोधात खंडणीच्या आरोपात FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश; राजकीय वर्तुळात खळबळ

Supriya Sule On Mahayuti Govt | सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारला इशारा; म्हणाल्या – ‘जेव्हा निवडणुका होतील तेव्हा…’

Vadgaon Sheri Assembly Constituency | वडगावशेरी मतदारसंघात महायुतीला खिंडार !
महानिर्धार मेळव्यात महायुतीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी हाती घेतली तुतारी; शरद पवार गटाचा विजयाचा महानिर्धार (Video)