Sharad Pawar NCP | निवडणूक आयोगाच्या चिन्हाबाबतच्या निर्णयाने शरद पवार यांना मोठा दिलासा

Tutari Symbol

मुंबई : Sharad Pawar NCP | निवडणूक आयोगाच्या निर्णयाने शरद पवार यांना मोठा दिलासा दिला आहे. कारण त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला आणि चिन्हाला अधिकृत मान्यता देण्यात आली आहे. त्यामुळं कलम २९ ब नुसार पक्षाला देणगी स्वीकारता येणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या चिन्हाबाबत आज निवडणूक आयोगासमोर सुनावणी झाली. (Tutari Symbol NCP)

यामध्ये या पक्षाला लोकसभेसाठी तात्पुरत्या स्वरूपात देण्यात आलेले तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह आता यापुढेही कायम राहणार आहे. याला निवडणूक आयोगाने अधिकृत मान्यता दिली आहे. त्यामुळे आता या पक्षाला कलम २९ ब अंतर्गत देणग्याही स्वीकारता येणार आहेत. निवडणूक आयोगाच्या या निर्णयामुळे शरद पवारांना मोठा दिलासा मिळाला आहे.

निवडणूक आयोगातील सुनावणीनंतर शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. “आज आमच्या चार वेगवेगळ्या महत्त्वाच्या सुनावण्या दिल्लीत होत्या. शरद पवार यांचा पक्ष ज्याप्रकारे काढून घेण्यात आला, पण जनतेने आम्हाला आशीर्वाद दिले त्याबद्दल आभार. आम्हाला तुतारी हे चिन्ह तात्पुरत्या स्वरूपात देण्यात आलं होतं. पण आम्हाला चेक घेण्याचा अधिकार नव्हता. तसेच टॅक्स बेनिफिट मिळत नव्हता. तर आता आमची विनंती मान्य करण्यात आली आहे”, अशी माहिती सुप्रिया सुळे यांनी दिली. (Sharad Pawar NCP)

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Pune Hit & Run Case | पुणे हिट अँड रन: ऑनड्युटी असलेल्या 2 पोलीस कर्मचाऱ्यांना उडवलं,
एकाचा मृत्यू तर एक गंभीर

Rain In Lonavala Khandala | लोणावळा, खंडाळ्यात संततधार; पाऊस, धुके अन् पर्यटकांची गर्दी

Sharad Pawar On Devendra Fadnavis | “फडणवीसांचा सुरुवातीचा काळ मला चांगला वाटला पण आता…”
शरद पवारांचे मोठे विधान