Sharad Pawar NCP | तिसऱ्या आघाडीबाबत शरद पवारांची मिश्किल टिप्पणी; म्हणाले – ‘आमची झोप उडालीय, भयंकर अस्वस्थ…’

सांगली: Sharad Pawar NCP | आगामी विधानसभा निवडणुकीच्या (Maharashtra Assembly Election 2024) पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला आहे. लोकसभेत भाजपला फटका बसल्यानंतर आता भाजपने (BJP) आगामी निवडणुकीसाठी कंबर कसली आहे. दरम्यान महायुती आणि महाविकास आघाडीत (Mahayuti Vs Mahavikas Aghadi) जागावाटपाची चर्चा अंतिम टप्प्यात आल्याची माहिती आहे.
https://www.instagram.com/p/DAuzA9BpakK
दरम्यान यंदा विधानसभेला तिरंगी लढत पाहायला मिळणार आहे. कारण राज्यात महायुती आणि महविकास आघाडीला टक्कर देण्यासाठी तिसऱ्या आघाडीबाबत घोषणा करण्यात आली आहे. प्रहार संघटनेचे आमदार बच्चू कडू (Bachchu Kadu), स्वराज्य संघटनेचे संभाजीराजे छत्रपती (Sambhajiraje Chhatrapati) , भारतीय बौद्ध महासभेचे राजरत्न आंबेडकर (Rajratna Ambedkar), स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी (Raju Shetti) यांच्यासारख्या इतर छोट्यामोठ्या संघटनांनी एकत्र येऊन नवीन आघाडीबाबत घोषणा केली आहे. दरम्यान आता याबाबत शरद पवार यांनी महत्वाचे विधान केले आहे. (Parivartan Mahashakti)
https://www.instagram.com/p/DAuxai4pJ3p
तिसरी आघाडी आकार घेत आहे. तिसऱ्या आघाडीचा आगामी विधानसभा निवडणुकीत काही परिणाम दिसेल का, असा प्रश्न पत्रकारांनी शरद पवार यांना विचारला होता. राज्यात निर्माण होऊ पाहणाऱ्या तिसऱ्या आघाडीची खिल्ली उडविताना पवार म्हणाले, ” मोठ्या ताकदीचे नेते असा प्रयत्न करत आहेत. राज्याच्या राजकारणावर त्याचा मोठा परिणाम होऊ शकतो. त्यामुळे आम्ही घाबरलो आहोत.
https://www.instagram.com/p/DAuvN86pSkF
कधीही जेव्हा लोक एकत्र येतात तेव्हा त्यांचा परिणाम होणार.
संभाजीराजे वगैरे एकत्र आल्यामुळे नक्कीच परिणाम होणार. त्यामुळे आमची झोप उडाली आहे.
आम्ही भयंकर अस्वस्थ आहोत. आता आपले काय होणार असा प्रश्न आम्हाला पडला आहे”,
असा चिमटा काढत मिश्किल टिप्पणी शरद पवार यांनी केली आहे.
https://www.instagram.com/p/DAtMA4zJoDT
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Ratnagiri Assembly Constituency | विधानसभेत उदय सामंतांना आव्हान देण्यासाठी ठाकरे गटाची रणनीती;
भाजपचा नेता आयात करण्याच्या हालचाली