Sharad Pawar NCP | शरद पवारांच्या हस्ते उद्या सर्व खासदारांचा सत्कार सोहळा पार पडणार; महायुतीचे कोणते खासदार उपस्थित राहणार ? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
अकलूज: Sharad Pawar NCP | शरद पवारांच्या हस्ते राज्यातील सर्व खासदारांच्या सत्काराचे आयोजन करण्यात आले आहे. दरम्यान महायुतीचे कोणकोणते खासदार या सोहळ्याला हजेरी लावणार? याकडे आता संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. देशाचे माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे (Sushilkumar Shinde) यांच्या ८४ व्या वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतनाचा सोहळा अकलूज येथे खासदार धैर्यशील मोहिते पाटील (Dhairyasheel Mohite Patil) यांनी आयोजित केला आहे.
https://www.instagram.com/p/DAdLeMDi9Se
अकलूज येथील विजयसिंह मोहिते पाटील (VijaySingh Mohite Patil) क्रीडा संकुल येथे हा भव्य मेळावा आयोजित करण्यात आला असून येथे मोहिते पाटील यांचे शक्ती प्रदर्शन पाहायला मिळणार आहे. या कार्यक्रमास राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat), विजयसिंह मोहिते पाटील, शेकाप सरचिटणीस जयंत पाटील, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांच्यासह अनेक दिग्गज उपस्थित राहणार आहेत.
https://www.instagram.com/p/DAdIfXjJ8ks
राज्यात निवडून आलेल्या सर्व ४८ खासदारांना सत्कारासाठी निमंत्रित केले आहे. मंत्री वगळता सर्व पक्षाचे नूतन खासदार येतील, असा विश्वास खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी व्यक्त केला आहे. दरम्यान मविआ ने महायुतीला लोकसभेला जोरदार धक्का दिल्याने या कार्यक्रमाला महायुतीचे कोणते खासदार उपस्थित राहणार याबाबत चर्चा सुरु आहेत.
https://www.instagram.com/p/DAdGu1YNvV3
लोकसभा निवडणुकीत जे नवीन समीकरण बनले त्याचा चमत्कार महाराष्ट्राने बघितला, असे सांगताना उद्याच्या कार्यक्रमानंतर काय होईल हे महाराष्ट्र पाहील, असेही संकेतही यावेळी खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी दिले आहेत.
https://www.instagram.com/p/DAdEUt8Cl2u
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Vadgaon Sheri Assembly Constituency | वडगावशेरी मतदारसंघात महायुतीला खिंडार !
महानिर्धार मेळव्यात महायुतीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी हाती घेतली तुतारी; शरद पवार गटाचा विजयाचा महानिर्धार (Video)