Sharad Pawar NCP | ‘तर विधानसभेत त्यांचा प्रचार करणार नाही’, राज्यातील महत्वाच्या पदाधिकाऱ्यांचे शरद पवारांना पत्र; आता पवारांच्या भूमिकेकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष

Sharad Pawar

पुणे : Sharad Pawar NCP | पक्ष सोडून गेलेले आता राजकीय बदलाचे वारे पाहात पुन्हा महाविकास आघाडीत (Mahavikas Aghadi) येण्यासाठी प्रयत्नशील आहेत त्यांना विधानसभेची उमेदवारी देऊ नका, अशी विनंती राज्यातील अनेक कार्यकर्त्यांनी शरद पवार यांना पत्र पाठवून केली आहे. (Maharashtra Assembly Election 2024)

https://www.instagram.com/p/DAkk8drJ6Sr

तरीही उमेदवार दिल्यास त्यांचा प्रचार करणार नसल्याची स्पष्ट भूमिका त्यांनी घेतली आहे. दरम्यान शरद पवार गटात पक्षप्रवेश करून तुतारी चिन्हावर लढण्यासाठी अनेकजण उत्सुक आहेत. त्या पार्श्वभूमीवर या पत्राने नेत्यांची चिंता वाढल्याचे दिसत आहे.

https://www.instagram.com/p/DAkdEHzJUMQ

डॉ. जी.जी. पारीख, नितीन वैद्य, तुषार गांधी, शरद कदम, डॉल्फी डिसोझा, संभाजी भगत, फिरोज मिठीबोरवाला, अर्जुन डांगळे (मुंबई), विश्वास उटगी (ठाणे), ऍड. वर्षा देशपांडे (सातारा), धनाजी गुरव (सांगली), माधव बावगे (लातूर), सुरेश खोपडे (बारामती), अविनाश पाटील (धुळे ) आणि सुभाष वारे (पुणे ) यांनी हे पत्र शरद पवार यांना दिले आहे.

https://www.instagram.com/p/DAke8lGCF0i

“विधानसभेची उमेदवारी देताना काही विचार होणे आवश्यक आहे. लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला मोठे यश मिळाले. भाजप सरकारचा संविधानविरोधी कारभार आणि संविधान बदलण्याबाबत भाजपाच्या नेत्यांनी केलेली वक्तव्ये, याला मतदारांनी दिलेली ती प्रतिक्रिया होती.

https://www.instagram.com/p/DAkal4qJcHk

संविधानविरोधी कारभार सुरु असताना भाजपमध्ये गेलेल्या व तेथून परत येणाऱ्या लोकांना उमेदवारी दिल्यास आमच्या सारख्या कार्यकर्त्यांना अशा उमेदवाराचे समर्थन करणे अवघड आहे”, असे दिलेल्या पत्रात म्हंटले आहे. आम्ही सामाजिक चळवळीत असणारे कार्यकर्ते त्या विधानसभा मतदारसंघांत अशा उमेदवाराचे काम करणार नाही, अशी उघड भूमिका या कार्यकर्त्यांनी घेतली आहे. पक्ष चालविताना व वाढविताना तुमच्यासमोरील आव्हाने आम्ही समजू शकतो.

https://www.instagram.com/p/DAjErLWCf33

मात्र राजकारणात मूल्ये, नैतिकता व विचार महत्त्वाचा आहे हे आपणासही मान्य व्हावे.
त्यामुळे ही बाब तात्पुरत्या फायद्यापेक्षा दीर्घकालीन राजकारणाच्या दृष्टीने विचारात घेतली जावी,
अशी विनंती कार्यकर्त्यांनी आपल्या पत्रात केली आहे. (Sharad Pawar NCP)

https://www.instagram.com/p/DAjB7M1ijQd

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Nirmala Sitharaman | अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्याविरोधात खंडणीच्या आरोपात FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश; राजकीय वर्तुळात खळबळ

Supriya Sule On Mahayuti Govt | सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारला इशारा; म्हणाल्या – ‘जेव्हा निवडणुका होतील तेव्हा…’

Vadgaon Sheri Assembly Constituency | वडगावशेरी मतदारसंघात महायुतीला खिंडार !
महानिर्धार मेळव्यात महायुतीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी हाती घेतली तुतारी; शरद पवार गटाचा विजयाचा महानिर्धार (Video)