Sharad Pawar NCP On Ajit Pawar | ‘स्वाभिमानी महाराष्ट्र म्हणतो, चुकीला माफी नाही’, शरद पवार गटाचा अजित पवारांवर निशाणा, “सतत चुका करून दमदाटीच्या स्वरात ‘माफी’ मागणाऱ्यांना…”

sharad-pawar-ajit-pawar

पुणे : Sharad Pawar NCP On Ajit Pawar | मालवणमधील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी (Malvan Shivaji Maharaj Statue) विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांना धारेवर धरले जात आहे. त्यातच महायुतीचे घटक असलेले राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जनसन्मान यात्रेच्या जाहीर सभेत या प्रकरणावरून महाराष्ट्रातील १३ कोटी जनतेची जाहीर माफी मागतो, असे विधान केले. त्यावरून राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून अजित पवारांना खोचक टोला लगावण्यात आला आहे.

शरद पवार गटाच्या सोशल मीडिया अकाऊंटवर एक व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे. या व्हिडिओत अजित पवारांनी ९ ऑगस्ट आणि २४ ऑगस्ट रोजी केलेल्या भाषणातील काही भाग आहे. त्याखाली स्वाभिमानी महाराष्ट्र म्हणतो, चुकीला माफी नाही अशा आशयाचा व्हिडिओ आहे.

या व्हिडिओच्या कॅप्शनला म्हटले आहे की, सतत चुका करून दमदाटीच्या स्वरात ‘माफी’ मागणाऱ्यांना असं वाटतं असेल की, महाराष्ट्र गद्दारी विसरेल. तर हा तुमचा भ्रम आहे कारण स्वाभिमानी महाराष्ट्र सर्व काही स्वीकारतो पण गद्दारी आणि गुलामी स्वीकारत नाही, असा हल्लाबोल अजित पवारांवर करण्यात आला आहे.

अजित पवार म्हणाले की, आता लोकसभेला जो काही झटका दिलाय तो लईच लागलाय, पार कंबरडं मोडायची वेळ आली,
पण आता माफ करा. चूक झाली, असे म्हंटले.
तर मालवण राजकोट किल्ल्यावरील घटनेवर बोलताना महाराष्ट्राच्या आराध्य दैवताचा पुतळा वर्षाच्या आत पडणे दुर्दैवी आहे.
मी याबद्दल महाराष्ट्रातील १३ कोटी जनतेची माफी मागतो, असं या व्हिडिओत अजित पवार बोलताना ऐकायला मिळत आहे. (Sharad Pawar NCP On Ajit Pawar)

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Sharad Pawar Z+ Security Cover | झेड प्लस सुरक्षेबाबत संशय, शरद पवार तातडीने दिल्लीला रवाना; घडामोडींना वेग

Pune Crime Branch News | खूनासह 4 गुन्हे असलेल्या गुंडाकडून पिस्टल व एक जिवंत राऊंड जप्त; खंडणी विरोधी पथकाची कामगिरी

Ganesh Biradar | बारामती अपर पोलीस अधीक्षकपदी गणेश बिरादार

Sadashiv Peth Pune Fire News | आग लागलेल्या घरातून श्वानाची सुखरुप सुटका; सदाशिव पेठेतील रमेश डाईंगजवळील घटना