Sharad Pawar NCP On Mahayuti Govt | ‘येत्या दोन- तीन महिन्यांत चंद्र-तारे देवू म्हणतील’; महायुती सरकारवर शरद पवार गटाचा निशाणा

Jayant Patil eknath shinde

सांगली : Sharad Pawar NCP On Mahayuti Govt | विधानसभेच्या आगामी निवडणुकीवर (Maharashtra Assembly Election 2024) डोळा ठेवून राज्य सरकारने राज्यातील मतदारांसाठी लोकप्रिय घोषणा जाहीर करण्याचा सपाटा लावला आहे. ‘लाडकी बहीण’ योजनेपाठोपाठ आता ‘लाडका भाऊ’ योजनेची (Ladka Bhau Yojana) घोषणा करण्यात आली. ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण’ योजनेवर (Majhi Ladki Bahin Yojana) सडकून टीका झाल्याकडे कानाडोळा करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी बुधवारी आषाढी एकादशीचे (Ashadhi Ekadashi) औचित्य साधून ‘लाडका भाऊ’ योजना जाहीर केली आहे. यावरून आता महायुती सरकारवर विरोधकांकडून पुन्हा टीका होत आहे.

राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील (Jayant Patil) यांनी महायुती सरकारला खोचक टोला लगावला आहे. ते म्हणाले, ” घाबरलेले सरकार सवंग लोकप्रियतेसाठी घोषणाबाजी करत असून येत्या दोन- तीन महिन्यांत चंद्र-तारे देवू म्हणतील, असा उपरोधिक टोला राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी लगावला. (Sharad Pawar NCP On Mahayuti Govt)

इस्लामपूर येथे राष्ट्रवादी असंघटीत बांधकाम कामगार शरदचंद्र पवार पक्षाच्या वाळवा तालुका,
इस्लामपूर शहर व आष्टा शहराच्या वतीने दोन हजार कष्टकरी कुटुंबांना भांडी संच वाटप करण्यात आले.
याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी प्रतिक पाटील, सुभाषराव सुर्यवंशी, पक्षाचे शहराध्यक्ष शहाजी पाटील,
नेर्ल्यांचे सरपंच संजय पाटील, पैलवान भगवान पाटील, संदीप पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

Follow pune.news on : https://news.google.com/publications/CAAqBwgKMPDv0Aswr4voAw

हे देखील वाचा

Pune Crime News | पुणे: हायब्रीड पॉवर पॅक प्रोडक्ट उत्पादनातून फायदा करुन देण्याचे आमिष, डॉक्टरची 10 कोटींची फसवणूक

Sanjay Raut On Sharad Pawar | “शरद पवार हे देशाच्या राजकारणातील नटसम्राट तर भुजबळ हे…”; संजय राऊतांचा निशाणा

You may have missed