Sharad Pawar NCP | ‘निवडणुकीच्या प्रक्रियेत मी थांबायचं ठरवलंय’, निवृत्तीच्या चर्चेवर शरद पवारांचे भाष्य; म्हणाले – ‘निवडणुका लढणं वेगळं आणि राजकारणात सातत्य ठेवणं वेगळं’

मुंबई: Sharad Pawar NCP | राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी आता कोणतीही निवडणूक लढवणार नसल्याचे संकेत दिले. विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने शरद पवार बारामती मतदारसंघात दौरे करत आहेत. दरम्यान प्रचारसभेत बोलताना शरद पवारांनी निवृत्तीचे संकेत दिले होते. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरु आहेत. (Maharashtra Assembly Election 2024)
मात्र आता या विधानाला घेऊन माध्यमांशी संवाद साधताना शरद पवार यांनी अधिकचा खुलासा केला आहे. शरद पवार म्हणाले, ” मी तसं नाही म्हटलं. मी असं म्हटलं… मी सांगत हे होतो की, माझ्या कुटुंबाचा विषय होता तो. मी २५-३० वर्षे, माझ्यानंतर २५-३० आणि त्यानंतर पुढची २५-३० वर्षासाठी एक पिढी तयार करावी, ही माझी त्यातली इच्छा होती “, असे शरद पवारयांनी म्हंटले आहे.
“आता माझ्या पुरता बोलत असताना मी हे सांगितलं की, मी आता निवडणूक लढणार नाही. हे आजच नाही, २०१४ पासून मी निवडणूक लढलो नाही. मी राज्यसभेवर गेलो. निवडणुकीला स्वतः उभं राहिलो नाही. माझ्या मतदारसंघात सुप्रिया उभी राहिली चार वेळा. म्हणजे थेट निवडणुकीच्या प्रक्रियेत मी थांबायचं ठरवलं आहे”, असे शरद पवार यांनी सांगितले.
ते पुढे म्हणाले, ” मी आता हा विचार करतोय की, माझी दोन वर्षांनी टर्म संपेल. त्यावेळी विचार करूया की, जायचं की नाही. याचा अर्थ ज्या पद्धतीने मांडलं गेलं की, हे असे असे संकेत आहेत. प्रश्न असा आहे की, निवडणुका लढणं वेगळं आणि राजकारणात सातत्य ठेवणं वेगळं. मी राजकारण आणि समाजकारण यापासून बाजूला राहणार नाही. ते मी करतच राहीन जोपर्यंत मला शक्य आहे, तोपर्यंत”, अशी भूमिका शरद पवार यांनी मांडली आहे.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/
Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Sunil Shelke MLA | अजित पवार गटाचे उमेदवार सुनील शेळकेंच्या अडचणीत वाढ, शिरगाव पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल
Shivaji Nagar Assembly | सुरक्षा आणि वाहतूक कोंडी सोडविण्यात शिवाजीनगरमधील आमदार, नगरसेवकांना आले अपयश
Parvati Assembly Election 2024 | ‘मतदारसंघातील जनता विजयाची तुतारी वाजवणारच’, अश्विनी कदम
यांचा विश्वास, पदयात्रेत महिलांचा लक्षणीय सहभाग
hhagan Bhujbal On ED And BJP | ‘ईडीपासून वाचण्यासाठी आम्ही भाजपबरोबर’, भुळजबळांच्या दाव्याने
राजकारणात खळबळ; म्हणाले – “मी OBC असल्याने केंद्रीय यंत्रणा माझ्या मागे, उच्च जातीचा असतो तर…’
Pune ACB Demand Trap News | जॅमर काढण्यासाठी लाचेची मागणी करणार्या सहायक फौजदारासह ट्राफिक वॉर्डनवर गुन्हा दाखल