Sharad Pawar | दिलीप वळसे पाटलांना बालेकिल्ल्यातच धक्का; देवदत्त निकम यांना रिंगणात उतरवण्याचे शरद पवारांचे संकेत

dilip-walse-patil-sharad-pawar

आंबेगाव : Sharad Pawar | शरद पवार यांच्याकडून आगामी विधानसभा निवडणुकीच्या (Maharashtra Assembly Election 2024) दृष्टिकोनातून पायाभरणी सुरु झालेली आहे. आज शरद पवार आंबेगाव (Ambegaon) दौऱ्यावर आहेत. आंबेगाव हा दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) यांचा बालेकिल्ला समजला जातो. राष्ट्रवादीत फूट पडल्यावर दिलीप वळसे पाटील अजित पवार गटासोबत (Ajit Pawar NCP) गेले.

दरम्यान आता आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टिकोनातून वळसे पाटील यांना त्यांच्या बालेकिल्ल्यात धक्का देण्यासाठी शरद पवार यांनी रणनीती आखलेली आहे. वळसे पाटील यांच्या विरोधात देवदत्त निकम यांना रिंगणात उतरवण्याचे संकेत पवारांनी दिले आहेत. (Sharad Pawar)

याबाबत माध्यमांशी बोलताना शरद पवार म्हणाले, देवदत्त निकम (Devdatta Nikam)यांच्या बाबत अद्याप तरी विचार केलेला नाही. मात्र ज्या पद्धतीने एकेकाळी देवदत्त निकम यांनी भीमाशंकर सहकारी साखर कारखाना चालवला. त्यामुळे कर्तृत्ववान माणसाचं कर्तृत्व वाया जाऊ नये, याची विशेष काळजी घ्यायची आहे, असे स्पष्टपणे शरद पवार यांनी सांगितले. शरद पवार हे आज आंबेगाव तालुक्याच्या दौऱ्यावर आहेत. त्यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना संकेत दिले आहेत.

दरम्यान याअगोदर अजित पवारांचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या पिंपरी चिंचवडमध्ये
अजित पवार गटाचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांनी काही पदाधिकाऱ्यांसह शरद पवार गटात प्रवेश केला.
त्यानंतर आज अजित पवार गटाचे आमदार अतुल बेनके यांनी शरद पवार यांची भेट घेऊन
चर्चा केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्याचे चित्र पाहायला मिळाले. आता दिलीप वळसे पाटलांना त्यांच्या बालेकिल्ल्यात धक्का देण्याची पवारांनी रणनीती आखल्याचे दिसत आहे.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Ajit Pawar On Pink Colour Dress Jacket | पिंक पॉलिटिक्स वर अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया; गुलाबी रंगाच्या जॅकेटबाबत म्हणाले,… (Video)

Sharad Pawar NCP | ‘ज्यांनी आमचं काम केलं ते आमचे’ अजित पवार गटाचे आमदार अतुल बेनके
यांच्या भेटीनंतर शरद पवारांचे सूचक वक्तव्य चर्चेत

Dandekar Pool Pune Crime News | पुणे: अल्पवयीन मुलीकडे लग्नाची मागणी करुन असभ्य वर्तन, 40 वर्षीय नराधमाला अटक

You may have missed