Sharad Pawar | ‘मी आस्तिक की नास्तिक यावर बऱ्याचदा बोललं जातं’, शरद पवारांचे भाष्य म्हणाले, “मी पांडुरंगाच्या दर्शनाला जातो, पण कधीही…”
पुणे : Sharad Pawar | आपल्या संतानी लिहलेलं धन ही महाराष्ट्राची जमेची बाजू असल्याचे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केलं. वारकरी कशाचीही पर्वा न करता पिढ्यान पिढ्या पंढरीची वारी साठी माऊलींचं दर्शन घेऊन पंढरपूरकडे विठ्ठलाचे दर्शन घेण्यासाठी निघतात.
मी देखील पांडुरंगाचे दर्शन घ्यायला जातो, पण मी कधीही गाजावाजा नाही करत नाही. पांडुरंगाचं दर्शन करायला जातो हे काय जगाला सांगायची गरज नाही. प्रसिद्धी पेक्षा दर्शन समाधानकारक असतं असेही पवारांनी सांगितले.
माध्यमांशी बोलताना शरद पवार म्हणाले, मी आस्तिक की नास्तिक याबाबत बऱ्याचदा बोललं जातं. मी पांडुरंगाच्या दर्शनाला जातो, पण कधीही गाजावाजा करत नाही. पांडुरंगाच्या दर्शनाला गेल्यावर सगळ्या जगाला कळालं पाहिजे असं काही नाही. मी प्रसिद्धीच्या भागात कधी पडत नसल्याचे शरद पवार यांनी म्हंटले.
मला पोलिसांनी इथे येण्याच्या आधी विचारलं की तुम्ही जाणार आहेत का? मी म्हणलं हो जाणार आहे. काही लोकांना मी जाणार म्हणून अस्वस्थता जाणवली पण हे जे लोकं आहेत ते पांडुरंगाचे खरे भक्त आहेत का? असा सवाल शरद पवार यांनी उपस्थित केला.
वारीमध्ये जाऊन पांडुरंगाच्या दर्शनासाठी जाणारा खरा वारकरी आहे.
पांडुरंगाच्या नावाने व्यवसाय करणाऱ्या घटकांना मी पांडुरंगाचा भक्त मानत नाही,
असेही शरद पवार यांनी सांगितले. (Sharad Pawar)
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
BJP On Maharashtra Assembly Election 2024 | विधानसभा निवडणुकीसाठी भाजपची नवी रणनीती;
टूलकिट पुन्हा चर्चत?, विविध राज्यातील नेत्यांना प्रचारकार्यात उतरवण्याचा निर्णय