Sharad Pawar NCP | शरद पवारांनी मोहोळ विधानसभा मतदारसंघातील उमेदवार बदलला; ‘या’ नेत्याच्या हातात तुतारी

Siddhi Ramesh Kadam-Sharad Pawar

सोलापूर: Sharad Pawar NCP | विधानसभेची उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज (दि.२९) शेवटचा दिवस असल्याने राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. त्यातच आता महाविकास आघाडीने (Mahavikas Aghadi) आपले उमेदवार बदलले आहेत. काँग्रेसने कोल्हापूरमध्ये (Kolhapur Assembly) उमेदवार बदलला आहे, तर दुसरीकडे राष्ट्रवादी शरद पवार गटाने मोहोळ विधानसभा (Mohol Assembly) मतदारसंघात उमेदवार बदलला आहे. (Maharashtra Assembly Election 2024)

राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून सिद्धी रमेश कदम (Siddhi Ramesh Kadam) यांना देण्यात आलेली उमेदवारी रद्द करण्यात आली आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी अचानक सिद्धी कदम यांची उमेदवारी रद्द करत त्यांच्या ऐवजी मोहोळमधून राजू खरे (Raju Khare) यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

अचानक उमेदवारी बदलण्यात आल्यामुळे मोहोळच्या राजकारणात अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. याबरोबरच जयंत पाटील (Jayant Patil) यांनी यासंदर्भात निवडणूक अधिकाऱ्यांना एक पत्र देत सिद्धी रमेश कदम यांच्या नावे देण्यात आलेला पक्षाचा एबी फॉर्म रद्द समजण्यात यावा, असं पत्र देण्यात आल्याची माहिती सांगण्यात येत आहे.

सिद्धी कदम यांच्या उमेदवारीवरून स्थानिक पदाधिकाऱ्यांनी शरद पवार यांची भेट घेत नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळे सिद्धी कदम यांची उमेदवारी रद्द करण्यात आली असल्याची माहिती आहे.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Purandar Assembly Election 2024 | पुरंदर मतदारसंघात काँग्रेसची पुनरावृत्ती की विजय शिवतारे गड जिंकणार? राजकीय वर्तुळात चर्चा

Nirbhay Bano Campaigns | ‘निर्भय बनो’च्या सभा आता विधानसभेलाही होणार; मविआला सशर्त पाठिंबा; असीम सरोदे म्हणाले,”लाडकी नव्हे धाडसी बहीण योजना हवी”

Mantarwadi Pune Fire News | मंतरवाडीतील पेंटच्या गोडावूनला मध्यरात्री भीषण आग ! दोन टेम्पो, दोन दुचाकी ही आगीच्या भक्ष्यस्थानी (Video)