Sharad Pawar NCP | राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून दोन बंडखोर नेत्यांवर कारवाईचा बडगा; पक्षाकडून निलंबनाची कारवाई

Sharad-Pawar

मुंबई : Sharad Pawar NCP | विधानसभा निवडणुकीच्या (Maharashtra Assembly Election 2024) पार्श्वभूमीवर महायुती आणि महाविकास आघाडीत बंडखोरी केलेल्या नेत्यांवर कारवाई करण्यात येत आहे. याआधी भाजप आणि काँग्रेसने बंडखोर यांविरोधात कारवाईचा बडगा उगारला होता. आता या पाठोपाठ राष्ट्रवादी शरद पवार गटाने दोन बंडखोर नेत्यांवर कारवाई केली आहे. राहुल जगताप (Rahul Jagtap), राजू तिमांडे (Raju Timande) यांना पक्षातून निलंबित करण्यात आले आहे.

श्रीगोंदा विधानसभा (Shrigonda Assembly Election 2024) मतदारसंघात महायुतीकडून (Mahayuti) विक्रम पाचपुते (Vikram Pachpute) यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर महाविकास आघाडीत (Mahavikas Aghadi) बिघाडी झाल्याचे पाहायला मिळाले. महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी शरद पवार गटातून राहुल जगताप यांना उमेदवारी मिळेल, अशी शक्यता वर्तवली जात होती.

मात्र, राष्ट्रवादी अजित पवार गटामधून (Ajit Pawar NCP) शिवसेना ठाकरे पक्षामध्ये (Shivsena UBT) प्रवेश केलेल्या अनुराधा नागवडे यांना महाविकास आघाडीची उमेदवारी देण्यात आली. यामुळे राहुल जगताप नाराज झाले होते. त्यानंतर जाहीर सभा व रॅली काढून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यामुळे आता शरद पवार गटाकडून राहुल जगताप यांना पक्षातून निलंबित करण्यात आले आहे.

हिंगणघाट विधानसभा मतदारसंघात महायुतीतून आमदार समीर कुणावार यांना तिसऱ्यांदा उमेदवारी जाहीर केली आहे. तर राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून प्रदेश सरचिटणीस अतुल वांदीले यांना उमेदवारी देण्यात आली आहे. यामुळे नाराज झालेल्या माजी आमदार राजू तिमांडे यांनी बंडखोरी करत उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

यामुळे हिंगणघाटमध्ये महाविकास आघाडीची डोकेदुखी वाढल्याचे चित्र आहे.
आता राजू तिमांडे यांच्या विरोधात राष्ट्रवादी शरद पवार गटाने कारवाईची बडगा उगारत त्यांना निलंबित केले आहे. (Sharad Pawar NCP)

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Kasba Peth Assembly Election 2024 | भाजपने गोवा निवडणुकीचा खर्च स्थायी समितीतून मिळालेल्या पैशातून केला;
‘मनसे’चे उमेदवार गणेश भोकरे यांचा हेमंत रासने यांच्यावर हल्लाबोल

Maharashtra Assembly Election 2024 | उद्धव ठाकरेंचे देवेंद्र फडणवीसांवर टीकास्त्र;
म्हणाले – ‘आधी स्वत:चं जॅकेट सांभाळा, मग धर्मयुद्ध करा’

Vadgaon Sheri Assembly Election 2024 | वडगावशेरी विधानसभा मतदारसंघ : बापुसाहेब हे सामान्यांचे आधार – खासदार नीलेश लंके

You may have missed