Sharad Pawar NCP Vs BJP | भाजपचा आणखी एक नेता हातात तुतारी घेणार; दिले स्पष्ट संकेत; म्हणाले – “कार्यकर्त्यांच्या भावना विचारात घेऊन…”
पंढरपूर : Sharad Pawar NCP Vs BJP | आगामी विधानसभा निवडणुकीच्या (Maharashtra Assembly Election 2024) पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापलं आहे. इच्छुक उमेदवार उमेदवारी ज्या पक्षातून मिळेल तिथे पक्षांतर करताना दिसत आहेत. दरम्यान राष्ट्रवादी शरद पवार गटात माजी आमदार प्रशांत परिचारक (Prashant Paricharak) प्रवेश करतील अशी मागच्या काही दिवसांपासून चर्चा आहे.
https://www.instagram.com/p/DAczJOtJDbk
दरम्यान पंढरपूर विधानसभेच्या (Pandharpur Assembly Constituency) आखाड्यात प्रशांत परिचारक यांची भूमिका निर्णायक वळणावर येऊन ठेपली असून दोन दिवसापूर्वी कोल्हापूर येथे झालेल्या कार्यकर्ता संवाद बैठकीत त्यांनी हजेरी लावली लावल्यामुळे ते भाजप सोडणार नाहीत हे स्पष्ट झाले होते. मात्र जालिहाळ येथे कार्यकर्त्यांशी बोलताना त्यांनी पक्ष प्रवेशाबाबत संकेत दिले आहेत.
https://www.instagram.com/p/DAc2qhLCX9O
तुमची जी भावना आहे ती मला निर्णय घेण्यास भाग पाडणार आहे. कार्यकर्त्यांच्या जीवावर आपण राजकारण करत असल्यामुळे कार्यकर्त्यांच्या भावना विचारात घेऊन निर्णय घेणार आहे. सध्या पितृपक्ष सुरू आहे चार दिवस थांबा. त्यानंतर भूमिका जाहीर करू, असे प्रतिपादन माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी तालुक्यातील जालिहाळ येथे बोलताना व्यक्त केले. त्यामुळे आगामी काळात परिचारक हे हातात तुतारी घेणार याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाल्या आहेत. (Sharad Pawar NCP Vs BJP)
https://www.instagram.com/p/DAc1CHCJKCq
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Vadgaon Sheri Assembly Constituency | वडगावशेरी मतदारसंघात महायुतीला खिंडार !
महानिर्धार मेळव्यात महायुतीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी हाती घेतली तुतारी; शरद पवार गटाचा विजयाचा महानिर्धार (Video)