Sharad Pawar NCP | ‘राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचा कार्यकर्ता म्हणून आम्ही निष्ठावंत राहू’, शमशुद्दीन इनामदार यांचा खुलासा

sharad-pawar

पुणे : Sharad Pawar NCP | आगामी विधानसभा निवडणुकीच्या (Maharashtra Assembly Election 2024) पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे अनेक नेते पक्षाला रामराम करताना दिसत आहेत. त्यातच आता हडपसरमध्ये पाच माजी नगरसेवक अजित पवार (Ajit Pawar NCP) यांची साथ सोडणार असल्याची चर्चा होती. त्यामध्ये अजित पवार याचे कट्टर समर्थक मानले जाणारे आनंद अलकुंटे (Anand Alkunte) हडपसर विधानसभा मतदारसंघातून (Hadapsar Assembly) अपक्ष उमेदवारी अर्ज भरणार असल्याची माहिती आहे.

ते विद्यमान आमदार चेतन तुपे (Chetan Tupe MLA) यांच्या विरोधात निवडणूक लढवणार आहेत. आनंद अलकुंटे माजी नगरसेवक आहेत. सलग तीन वेळा पुणे महापालिका नगरसेवक म्हणून निवडून आले आहेत. त्यांनी पीएमपीएल चे माजी संचालक म्हणून ही काम केले आहे.

हडपसरमधून अजित पवार समर्थक माजी नगरसेवक प्रशांत म्हस्के, माजी नगरसेविका रुक्साना इनामदार यांचे पती शमशुद्दीन इनामदार (Shamshuddin Inamdar) यांच्यासह अजून दोन नगरसेवक अजित पवार यांची साथ सोडणार असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा होती. त्याबाबतची वृत्ते माध्यमातून प्रसिद्ध करण्यात आली होती. मात्र आता शमशुद्दीन इनामदार यांनी याबाबत खुलासा केला आहे.

माध्यमांशी बोलताना शमशुद्दीन इनामदार म्हणाले,
” सुरुवातीपासून आम्ही राष्ट्रवादी शरद पवार गटामध्ये असून लोकसभेच्या निवडणुकीत देखील डॉ. अमोल कोल्हे
यांना निवडून आणण्यात आमचा मोठा वाटा होता.
यापुढे देखील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचा कार्यकर्ता म्हणून आम्ही निष्ठावंत राहू.
तसेच यापुढे देखील हडपसर विधानसभेत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या उमेदवाराला निवडून आणण्याकरिता संपूर्ण ताकद लावू ” , असे इनामदार यांनी म्हंटले आहे. (Sharad Pawar NCP)

Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Maharashtra Assembly Election 2024 | जागावाटपावरून काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांचा सामूहिक राजीनामे देण्याचा इशारा; मविआत वाद चिघळला

Helmet Compulsory In Pune | पुण्यात हेल्मेटसक्ती! सुप्रीम कोर्टाने स्थापन केलेल्या रस्ता सुरक्षा समितीचे निर्देश

Chinchwad Assembly Election 2024 | चिंचवड विधानसभा निवडणुकीतून अश्विनी जगताप यांची माघार;
शंकर जगताप यांच्या उमेदवारीचा मार्ग मोकळा?

You may have missed