Sharad Pawar News | ‘सत्तेसाठी आमचा पक्ष, चिन्ह आणि सर्व हिसकावण्याचा प्रयत्न’, शरद पवारांचे वक्तव्य; म्हणाले – ‘सन 1980 ची पुनरावृत्ती झाल्याशिवाय राहणार नाही’

sharad pawar

बारामती : Sharad Pawar News | आगामी विधानसभा निवडणुकीच्या (Maharashtra Assembly Election 2024) पार्श्वभूमीवर सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करीत आहेत. महाविकास आघाडीचे शिरूर हवेलीचे उमेदवार (Shirur Assembly Election 2024) आमदार अशोक पवार (Ashok Pawar) यांनी पदाधिकाऱ्यांसह भेट घेत शरद पवार यांना दीपावलीच्या (Diwali) शुभेच्छा दिल्या. यानंतर शिरूर हवेलीतील कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना पवारांनी विरोधकांवर निशाणा साधला आहे.

“सन १९८० मध्ये माझ्या नेतृत्त्वात ५८ आमदार निवडून आले होते. मी विरोधी पक्षनेता होतो. यानंतर ५२ आमदार फुटून गेले होते, मी ६ आमदारांचा नेता राहिलो. परंतु, यानंतर झालेल्या निवडणुकीत फुटलेल्या सर्व आमदारांना मतदारांनी नाकारले. हा इतिहास आहे. आता याची पुनरावृत्ती झाल्याशिवाय राहणार नाही”, असे भाष्य शरद पवार यांनी केले आहे.

शरद पवार म्हणाले, ” सत्ता आपल्या हातात ठेवण्यासाठी पक्षांच्या फोडाफोडीचे राजकारण महाराष्ट्रात झाले. यात आमचा पक्ष, चिन्ह आणि सर्व हिसकावण्याचा प्रयत्न झाला. या सर्व उलथापालथीत जे मोजके लोक माझ्यासोबत भक्कमपणे राहिले, त्यात आमदार अशोक पवार हे एक आहेत.

खूप निर्धारपूर्वक, अनेक दबावाला तोंड देत ते निष्ठेने उभे आहेत. यामुळेच घोडगंगा बंद ठेवण्याचे चुकीचे काम शासनाने केले आहे. हा कारखाना शेतकऱ्यांची जीवन वाहिनी आहे. याचाही विसर पडला आहे. विरोधात असूनही अशोक पवारांच्या विकासकामांच्या जोरावर तालुका आज प्रगतीपथावर आहे.”

ते पुढे म्हणाले, ” केंद्र व राज्य शासनाने सर्व साखर कारखान्यांना सुरू करण्यासाठी मदत केली.
परंतु, एकमेव शिरूरच्या घोडगंगा साखर कारखान्याला मदत केली नाही.
हे सरकार सत्तेचा गैरवापर करत आहे. परंतु, या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचेच
सरकार स्थापन होणार आहे. यानंतर घोडगंगा साखर कारखाना कसा सुरू होत नाही, तेच मी पाहतो.

सध्या विरोधकांकडे आरोपांसाठी फक्त घोडगंगा बंद, हेच एकमेव हत्यार आहे.
मात्र, राज्यात सरकार बदलणार आहे. महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यावर रावसाहेबदादा पवार
घोडगंगा सहकारी साखर कारखाना सुरू करण्यासाठी मी स्वतः पुढाकार घेणार आहे.
त्यामुळे कारखान्याची कसलीच काळजी करू नका”, असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Maharashtra Assembly Election 2024 | हेलिकॉप्टरने एबी फॉर्म पाठवणं शिवसेना शिंदे गटाच्या अंगलट, चौकशी होणार; शिंदे गटाच्या अडचणी वाढण्याची शक्यता

Baramati Assembly Election 2024 | ‘तीन ठिकाणांवरून ऑफर होती, यंदा बारामतीतून उभा राहणार नव्हतो’, अजित पवारांचे वक्तव्य

Pune Crime News | भागीदारीतील कंपनीतून मेटरियल घेऊन स्वत:च्या कंपन्यांमार्फत विक्री करुन 2 कोटी 31 लाखांची फसवणूक