Sharad Pawar New | “….त्यावेळी शिवसेनेला भाजपापासून वेगळं करायचं होतं म्हणून चाचपणी”, शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
मुंबई: Sharad Pawar New | २०१४ ला भाजपला (BJP) पाठिंबा दिल्याच्या चर्चेवर शरद पवार यांनी भाष्य केले आहे. भाजपाला पाठिंबा देण्याचा काही प्रश्नच नव्हता. आम्हाला शिवसेनेला भाजपापासून वेगळं करायचं होतं म्हणून राजकीय चाचपणी केली असा गौप्यस्फोट शरद पवारांनी केला आहे. (Maharashtra Assembly Election 2024)
माध्यमाला दिलेल्या मुलाखतीत शरद पवार म्हणाले, ” विनाकारण नाही, तर २०१४ साली भाजपाला आम्हाला पाठिंबा द्यायचा नव्हताच. आम्हाला केवळ शिवसेना आणि भाजपा यांची जी युती होती त्यांना वेगळे कसं करता येईल. करू शकतो का हे आम्हाला पाहायचे होते. (Sharad Pawar New)
त्यासाठी चाचपणी म्हणून आम्ही राजकीय विधान केले आम्ही त्यांना मदत कधी केली नाही. केवळ विधान केले होते मात्र त्या विधानानंतर जसं आम्हाला हवं होते तेच झाले. भाजपा गेले आणि शिवसेना आमच्यासोबत आली. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री बनले”, असे शरद पवार यांनी म्हंटले.
२०१४ साली भाजपा-शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे सगळे प्रमुख पक्ष वेगवेगळे निवडणूक लढले होते. त्यात भाजपा सर्वात मोठा पक्ष बनला. त्यानंतर निकालाच्या दिवशीच शरद पवारांच्या सांगण्यावरून राष्ट्रवादी नेते प्रफुल पटेल यांनी माध्यमांना येऊन आम्ही भाजपाला सरकार बनवण्यासाठी बाहेरून पाठिंबा देऊ असं विधान केले.
त्यानंतर विधानसभेत भाजपाने बहुमत सिद्ध केले. तेव्हा शिवसेना विरोधी बाकांवर बसली होती. विरोधी पक्षनेते म्हणून एकनाथ शिंदे काम करत होते. मात्र काही महिन्यातच विरोधी बाकांवरील शिवसेना भाजपासोबत सत्तेत आली. त्यानंतर २०१९ पर्यंत शिवसेना-भाजपाने सरकार चालवले.
परंतु २०१९ च्या निवडणूक निकालानंतर मुख्यमंत्रिपदावरून शिवसेना भाजपात बिनसले आणि उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस राष्ट्रवादीसोबत हातमिळवणी केली. त्यानंतर शिवसेना- राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांची महाविकास आघाडी बनली आणि राज्यात उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/
Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
FIR On PMC Officers In Pune | पुणे महापालिका उपायुक्तासह शिक्षणाधिकारी, लिपिकांवर गुन्हा दाखल !
बनावट डिग्रीची मार्कलिस्ट तयार करुन महापालिकेची फसवणूक, आणखी पाच अधिकाऱ्यांच्या डिग्रीविषयी संशय
Maharashtra Assembly Election 2024 | ‘शरद पवार, ठाकरेंनी मनोज जरांगेंशी बोलायला सांगितलं’,
ऍड.असिम सरोदेंचा मोठा गौप्यस्फोट; म्हणाले – ” जरांगेंच्या भेटीत विधानसभेला उमेदवार न देण्याबाबत चर्चा…”
Devendra Fadnavis On Sharad Pawar | देवेंद्र फडणवीसांचा मोठा गौप्यस्फोट; म्हणाले –
“शरद पवारांच्या ‘त्या’ पत्रामुळेच 2019 मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली”