Sharad Pawar On Ajit Pawar NCP | हसन मुश्रीफ, वळसे-पाटलांना पाडण्याचं शरद पवारांचं आवाहन; अजित पवारांबाबत म्हणाले…

Sharad Pawar-Ajit Pawar

मुंबई : Sharad Pawar On Ajit Pawar NCP | विधानसभा निवडणुकीच्या (Maharashtra Assembly Election 2024) पार्श्वभूमीवर शरद पवार हे महाराष्ट्रभर प्रचारसभा घेत आहे NCP (AP). या सभांमधून राष्ट्रवादीतून बंड केलेल्या आमदारांविरोधात ते रोखठोक भूमिका मांडत आहेत. अजित पवारांसोबत गेलेल्या आमदारांच्या मतदारसंघात सभा घेत शरद पवार हे जाहीरपणे त्यांना पाडण्याचे आवाहन करत आहेत. त्यामुळे आता बारामतीमध्ये (Baramati Assembly Election 2024) अजित पवार यांनाही पाडा असं आवाहन शरद पवार करणार का?अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. NCP (SP)

लोकसभेप्रमाणेच आता विधानसभेलाही बारामती विधानसभा मतदारसंघ चर्चेत आहे. अजित पवार आणि युगेंद्र पवार (Yugendra Pawar) यांच्यात सामना होणार आहे. पक्षात बंड झाल्यानंतर साथ सोडून गेलेल्या दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) आणि हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांना निवडणुकीत पाडा असं आवाहन शरद पवार यांनी केले आहे. अशातच आता त्यांनी अजित पवारांबाबतची भूमिकाही स्पष्ट केली आहे.

माध्यमाला दिलेल्या मुलाखतीत शरद पवार म्हणाले, ” अजून मी बारामतीला गेलेलो नाही. परवा मी बारामतीला जाणार आहे. तिथं मी काय बोलणार हे आता तुम्हाला सांगणार नाही. दिलीप वळसे पाटील आणि हसन मुश्रीफ हे दोघेही माझ्या पक्षाच्या तिकिटावर माझ्या फोटोसह भाजपच्या उमेदवाराच्या विरोधात निवडून आले होते.

जनतेने त्यांना भाजपच्या विरोधात मत देऊन निवडून आणलं होतं. पण त्यांनी धोकाधडी केली आणि ते भाजपसोबत गेले.
ज्यांच्याविरोधात आम्ही मतं मागितली त्यांच्यासोबत हे सत्तेत असल्यामुळे मी बोललो आहे.
कारण लोकांच्या सोबत त्यांनी धोका केला”, असे शरद पवार यांनी म्हटले.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

FIR On PMC Officers In Pune | पुणे महापालिका उपायुक्तासह शिक्षणाधिकारी, लिपिकांवर गुन्हा दाखल !
बनावट डिग्रीची मार्कलिस्ट तयार करुन महापालिकेची फसवणूक, आणखी पाच अधिकाऱ्यांच्या डिग्रीविषयी संशय

Maharashtra Assembly Election 2024 | ‘शरद पवार, ठाकरेंनी मनोज जरांगेंशी बोलायला सांगितलं’,
ऍड.असिम सरोदेंचा मोठा गौप्यस्फोट; म्हणाले – ” जरांगेंच्या भेटीत विधानसभेला उमेदवार न देण्याबाबत चर्चा…”

Devendra Fadnavis On Sharad Pawar | देवेंद्र फडणवीसांचा मोठा गौप्यस्फोट; म्हणाले –
“शरद पवारांच्या ‘त्या’ पत्रामुळेच 2019 मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली”

You may have missed