Sharad Pawar On Ajit Pawar | ‘उद्या मला देखील तिकीट त्यांनीच दिलं म्हणतील’, शरद पवारांचा अजित पवारांना टोला
सातारा : Sharad Pawar On Ajit Pawar | विधानसभा निवडणुकीचा (Maharashtra Assembly Election 2024) प्रचार आता अंतिम टप्प्यात आला आहे. प्रचारासाठी अवघे दोन दिवस बाकी आहेत. त्यामुळे नेत्यांचे, दौरे, प्रचारसभांना वेग आला आहे. फलटण विधानसभा (Phaltan Assembly Election 2024) मतदारसंघात शरद पवार गटाचे उमेदवार दीपक चव्हाण (Deepak Chavan) यांच्या प्रचारार्थ शरद पवार यांची जाहीर सभा पार पडली. या साखरवाडीच्या प्रचार सभेत रामराजे निंबाळकर (Ramraje Nimbalkar) यांच्यावर केलेल्या टीकेवरून शरद पवारांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांचा समाचार घेतला आहे.
शरद पवार म्हणाले, ” ‘राज्यातले बडे नेते साखरवाडीला आले होते त्यांनी रामराजे नाईक निंबाळकर यांच्यावर हल्ला चढवला आणि म्हणाले रामराजेंना तिकीट मी दिलं. पक्षाचा अध्यक्ष मी, तिकीट देण्याचा अधिकार माझा. मग यांनी कसं तिकीट दिलं. उद्या म्हणतील शरद पवारांना देखील तिकीट मी दिलं.
एकमेकांचा सन्मान ठेवण्याची गरज आहे. रामराजे पहिल्यांदा अपक्ष म्हणून निवडून आले ते स्वतःच्या कर्तुत्वावर आलेत. यामुळे कुणी हे केलं ते केलं सांगू नये”, असे म्हणत अजित पवार यांचे नाव न घेता शरद पवार यांनी टीकास्त्र सोडले आहे. (Sharad Pawar On Ajit Pawar)
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/
Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Kasba Peth Assembly Election 2024 | भाजपने गोवा निवडणुकीचा खर्च स्थायी समितीतून मिळालेल्या पैशातून केला;
‘मनसे’चे उमेदवार गणेश भोकरे यांचा हेमंत रासने यांच्यावर हल्लाबोल
Maharashtra Assembly Election 2024 | उद्धव ठाकरेंचे देवेंद्र फडणवीसांवर टीकास्त्र;
म्हणाले – ‘आधी स्वत:चं जॅकेट सांभाळा, मग धर्मयुद्ध करा’