Sharad Pawar On Ajit Pawar | अजित पवारांच्या गुलाबी जॅकेट, पिंक पॉलिटिक्सवर शरद पवारांची खोचक प्रतिक्रिया; म्हणाले…

Sharad-Pawar-Ajit-pawar

पुणे : Sharad Pawar On Ajit Pawar | राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर दोन पक्ष निर्माण झाले असून दोन्ही पक्ष सध्या आगामी विधानसभा निवडणुकीच्या (Maharashtra Assembly Election 2024) तयारीला लागले आहेत. राष्ट्रवादीचे राष्ट्रीय नेते तथा उपमुख्यमंत्री अजित पवारांनी अगदी पेहराव बदलण्यापासून तयारी केल्याचे दिसून येत आहे. गुलाबी जॅकेट, गुलाबी बॅनर, गुलाबी गाडी आणि माहोल गुलाबी करुन ते सध्या लाडकी बहीण योजनेबाबत (Ladki Bahin Yojana) सर्वत्र जागृती करत आहेत. गेल्याकाही दिवसांपासून अजित पवारांच्या पिंक पॉलिटिक्सने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. महिला मतदारांना आकर्षून घेण्याकरता अजित पवारांकडून सर्वत्र गुलाबी रंगाचा वापर केला जातोय. चारचाकी वाहनांपासून ते कपड्यांपर्यंत अजित पवारांच्या आजूबाजूला गुलाबी रंग ठळकपणे दिसतोय.

त्यामुळे, आगामी विधानसभा निवडणुकीत त्यांना या गुलाबी रंगाचा फायदा होईल का, विधानसभेला महिला वर्ग त्यांच्याकडे आकर्षित होईल का?, असा प्रश्न पुण्यातील पत्रकार परिषदेत शरद पवार यांना विचारण्यात आला होता. त्यावर, शरद पवारांनी त्यांच्या स्टाईलने उत्तर दिले. (Sharad Pawar On Ajit Pawar)

शरद पवारांना हा प्रश्न विचारणाऱ्या पत्रकाराने निळ्या रंगाचा शर्ट घातला होता.
त्यामुळे, तुम्ही निळ्या रंगाचा शर्ट घातल्याने तुमच्याकडे महिला आकर्षित होतील का?,
असा प्रतिप्रश्न विचारत शरद पवारांनी मिश्कील टोला लगावला, त्यामुळे पत्रकारांमध्ये हशा पिकल्याचं पाहायला मिळालं.
तसेच, अजित पवारांच्या बदलत्या रंगाच्या भूमिकेचा त्यांना फायदा होणार नाही,
असेच काहीसे सूचक वक्तव्य शरद पवार यांनी केल्याचे पाहायला मिळाले.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Maharashtra Assembly Election 2024 | विधानसभा निवडणुकीत भाजपाचा 150 पेक्षा अधिक जागांवर लढण्याचा निर्धार ; बैठकीत मोठा निर्णय

Newly Married Couple Suicide | अवघ्या तीन महिन्यांपूर्वी लग्न, दोघेही पुण्यात नोकरीला; गावाकडे परतले अन् संपवलं जीवन

Instagram Love Story | पंजाबच्या तरुणीचं रत्नागिरीच्या तरुणाशी इन्स्टावर प्रेम जडलं; पंजाबवरून रत्नागिरी गाठली अन्…

Pune Crime News | मेंदूतील रक्तस्त्रावाने पोलीस कोठडीतील आरोपीचा मृत्यु

You may have missed