Sharad Pawar On Ajit Pawar | अजित पवार आले तर पुन्हा त्यांना पक्षात घेणार का?; शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले – ‘घरात सर्वांना जागा, पण…’

sharad-pawar-ajit-pawar

पुणे : Sharad Pawar On Ajit Pawar | महायुतीत (Mahayuti) अजित पवार अस्वस्थ असल्याची चर्चा सुरु आहे. भाजप (BJP) आणि शिंदे गटातील (Shivsena Eknath Shinde) नेते अजित पवारांवर निशाणा साधण्यासाठी एकही संधी सोडत नाहीत, अशी परिस्थिती आहे. दुसरीकडे मागच्या काही दिवसातच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुखपत्रातून अजित पवारांना महायुतीत घेतल्याबाबत प्रश्न उपस्थित करण्यात आले होते.

त्यानंतर आता ‘विवेक’ या मराठी साप्ताहिकानेही अजित पवारांच्या महायुतीतील प्रवेशावर आक्षेप नोंदवला आहे. आज पुण्यात शरद पवार यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. दरम्यान त्यांना ‘अजित पवार आले तर पुन्हा त्यांना पक्षात घेणार का? असा प्रश्न विचारण्यात आला असता शरद पवारांनी याबाबत भाष्य केले आहे.

शरद पवार म्हणाले, ” घरात सर्वांना जागा आहे पण पक्षात जागा आहे की नाही? याबाबत व्यक्तिगत मी निर्णय घेणार नाही. माझे सर्व सहकारी संघर्षाच्या काळात माझ्याबरोबर मजबुतीने उभे राहिले, त्यांना पहिल्यांदा विचारेल” असे सूचक विधान शरद पवार यांनी केले आहे. (Sharad Pawar On Ajit Pawar)

आगामी विधानसभेच्या दृष्टिकोनातून सर्व पक्षीयांकडून तयारी सुरु झालेली आहे.
महायुतीत आणि मविआ मध्ये जागावाटपावरून वादंग निर्माण होऊ शकतो.
त्यामुळे निवडणुकीच्या तोंडावर राज्यातील राजकीय समीकरणं बदलू शकतात अशीही चर्चा सुरु आहे.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

MLA Sunil Tingre | वडगाव शेरी, धानोरी भागातील पूरग्रस्तांचे सर्व्हेक्षण करुन नुकसान भरपाई देणार;
आमदार सुनिल टिंगरे यांच्या लक्षवेधीवर मंत्री उदय सामंत यांचे आश्वासन

Pune Crime News | पुणे: येरवड्यात पूर्ववैमनस्यातून सराईत गुन्हेगाराची ‘गेम’; कोयत्याने वार करुन खून करणाऱ्या तिघांना अटक

Eknath Shinde – Ashadhi Ekadashi | ‘पुढच्या वर्षी मीच मुख्यमंत्री म्हणून येणार की नाही… ‘ – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

You may have missed