Sharad Pawar On Anil Deshmukh Attack | अनिल देशमुखांवरील हल्ल्यानंतर शरद पवारांचा संताप; म्हणाले – “सत्ताधारी पक्ष सत्तेसाठी कोणत्याही थराला जाऊ शकतो”

Sharad Pawar - Anil Deshmukh

पुणे : Sharad Pawar On Anil Deshmukh Attack | विधानसभा निवडणुकीचा (Maharashtra Assembly Election 2024) प्रचार थंडावल्यानंतर काल सोमवार (दि.१८) माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या गाडीवर चार अज्ञात युवकांनी दगडफेक केल्याची घटना रात्री ८:३० वाजताच्या सुमारास घडली. या हल्ल्यात देशमुख यांच्या कपाळाला गंभीर इजा झाली.

काटोल-नरखेड येथे महाविकास आघाडीचे (Mahavikas Aghadi) उमेदवार (MVA Candidate) सलील देशमुख (Salil Deshmukh) यांच्या प्रचाराची सांगता सभा आटोपून देशमुख परत येत असताना चार युवक अचानक गाडीसमोर आले. एकाने गाडीच्या काचेवर दगडफेक केली. एक मोठा दगड देशमुख यांच्या कपाळाला लागला. रक्तस्राव झाल्याने त्यांना काटोल ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेवर आता शरद पवार यांनी संताप व्यक्त केला आहे.

“अनिल देशमुख आणि राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात राजकीय संघर्ष सुरू होता. या संघर्षामुळे देशमुख यांच्यावर हल्ला होऊ शकतो, असं आमच्या ऐकिवात होतं. जे ऐकिवात होतं ते प्रत्यक्षात घडलं आहे. सत्ताधारी पक्ष सत्तेसाठी कोणत्याही थराला जाऊ शकतो, हे आज स्पष्ट झालं आहे. या हल्ल्याचा मी निषेध करतो”, असे शरद पवार यांनी म्हंटले आहे.

शरद पवार म्हणाले, ” मी काही दिवसांपूर्वीच काटोल इथं गेलो होतो. त्याठिकाणी अनिल देशमुख आणि त्यांच्या चिरंजीवांना ज्या पद्धतीने प्रतिसाद मिळतोय ते पाहून सत्ताधारी पक्षाचे लोक अस्वस्थ झाल्याचं माझ्या ऐकिवात होतं.
हा प्रतिसाद सहन न झाल्याने आता अनिल देशमुख यांच्यावर शारीरिक हल्ला करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
याप्रकरणी मी आणखी माहिती घेण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र प्राथमिक माहितीनुसार,
हा निवडणुकीतूनच झालेला हल्ला आहे,” असा आरोप शरद पवार यांनी केला आहे. (Sharad Pawar On Anil Deshmukh Attack)

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Pune Police Tadipari Action | येरवडा परिसरातील 4 सराईत गुन्हेगार तडीपार ! पोलीस उपायुक्त हिंमत जाधव यांनी केली कारवाई

Maharashtra Assembly Election 2024 | दहा हजाराहून अधिक मतदार असलेल्या मतदान केंद्र इमारतींच्या ठिकाणी वाहन तळासाठी अतिरिक्त क्षेत्र उपलब्ध

Policeman Suicide News | तणावग्रस्त पोलीस कर्मचाऱ्यांची स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या; पोलीस दलात खळबळ

Maharashtra Assembly Election 2024 | मतदानासाठी मतदार ओळखपत्र नसल्यास ‘हे’ 12 प्रकारचे पुरावे ग्राह्य; मतदान केंद्रात मोबाईल घेऊन जाण्यास बंदी

Indapur Assembly Election 2024 | ‘दत्तात्रय भरणे सारख्या गद्दाराला पाडण्यासाठी पूर्ण ताकतीने काम करा’, जयंत पाटील यांचे इंदापूरमध्ये आवाहन

You may have missed