Sharad Pawar On Assembly Resluts | विधानसभा निवडणुकीच्या निकालावर शरद पवार यांचे भाष्य; म्हणाले – ‘आमची अपेक्षा होती…’

Sharad Pawar

सातारा : Sharad Pawar On Assembly Resluts | विधानसभा निवडणुकीचा (MH Assembly Election Results 2024) निकाल जाहीर झाला आहे. यामध्ये महायुतीला मोठे यश मिळाले आहे तर महाविकास आघाडीला (Mahavikas Aghadi) फटका बसला आहे. विधानसभेत विरोधी पक्षनेता निवडता येणार नाही अशी अवस्था मविआची झालेली आहे.

महायुतीने (Mahayuti) या निवडणुकीत पहिल्यांदाच २३५ पेक्षा जास्त जागांवर यश मिळवले. यामध्ये भाजपचा (BJP) १४८ जागांपैकी १३२ जागांवर, शिंदे गटाचा (Shivsena Shinde Group) ८५ जागांपैकी ५७ जागांवर तर अजित पवार गटाचा (Ajit Pawar NCP) ५१ जागांपैकी ४१ जागांवर विजय झाला आहे. महाविकास आघाडीच्या मोठ्या पराभवानंतर शरद पवार यांनी आज (दि.२४) भाष्य केले आहे. महायुतीच्या खोट्या प्रचाराचा फटका बसल्याची प्रतिक्रिया शरद पवार यांनी दिली.

माध्यमांशी बोलताना शरद पवार म्हणाले, ” हा लोकांनी निर्णय दिला आहे. आमची अपेक्षा होती तसा निकाल लागला नाही. पण शेवटी लोकांनी निर्णय दिला आहे. असा अनुभव आम्हाला कधी आला नाही. मात्र आता याचा अभ्यास करावा लागणार आहे. आम्ही पुन्हा एकदा कामाला लागू.

मी याबाबत काही बोलू इच्छित नाही. या निकालानंतर आम्ही त्याची कारणमिमांसा करू. त्यानंतर पुन्हा नव्याने कामाला सुरुवात करू. मी निवृत्त व्हावं की नाही, हे मी आणि माझे सहकारी ठरवतील. दुसऱ्यांनी कशाला सांगायला पाहिजे.

ते पुढे म्हणाले, ” लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून काही रक्कम महिलांना दिली.
आम्ही सत्तेत नसलो तर हे पैसे बंद होतील असा प्रचार करण्यात आला. त्यामुळं कदाचित महिलांनी मत महायुतीला दिले असेल.
सत्ताधाऱ्यांच्या या प्रचाराचा आम्हाला फटका बसला. कटेंगे तो बटेंगे या नाऱ्याचाही परिणाम झाला”, असे शरद पवार यांनी म्हंटले आहे.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Pravin Darekar On Devendra Fadnavis | “देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री होतील”, भाजप नेत्याचे मोठे वक्तव्य

Maharashtra Assembly Election Results | विधानसभा निवडणूक २०२४; देवेंद्र फडणवीस,
आदिती तटकरे, धनंजय मुंडे, गिरीश महाजन विजयी

Sanjay Raut On Assembly Results | ‘निकालामागे खूप मोठं कारस्थान, लोकशाहीचा कौल वाटत नाही”,
संजय राऊत संतापले, म्हणाले – ‘मविआला ७५, १०० जागाही देत नसाल तर…’

Maharashtra Assembly Election Results | महाराष्ट्रात भाजप महायुतीची लाट, मविआची मोठी
पिछेहाट, लाडक्या बहिणींमुळे महायुती सुसाट

You may have missed