Sharad Pawar On Babanrao Shinde | “आतापर्यंत जे कौतुक झालं ते खूप झालं, यापुढे यत्किंचितही मदत नाही”, शरद पवारांचा शिंदे बंधूंवर घणाघात; म्हणाले, “करमाळा आणि माढ्यातील…”
सोलापूर : Sharad Pawar On Babanrao Shinde | महाविकास आघाडीचे (Mahavikas Aghadi) करमाळ्याचे उमेदवार, माजी आमदार नारायण पाटील (Narayan Patil) यांच्या प्रचारार्थ जाहीर सभेत बोलताना शरद पवार यांनी माढा (Madha Assembly) आणि करमाळ्याच्या (Karmala Assembly) नेतृत्वावर प्रश्न उपस्थित करत निशाणा साधला आहे. “करमाळा आणि माढा येथील जे आमदार आहेत त्यांना आम्ही अनेक वर्ष मदत केली. लोकांचे प्रश्न सोडवू असा शब्द त्यांनी दिला. प्रामाणिकपणानं संघर्षात एकत्र उभं राहू असं सांगितलं. पण आज कुठे गायब झाले आहेत माहित नाही”, असे शरद पवार यांनी म्हंटले आहे.
शरद पवार म्हणाले, ” करमाळा आणि माढ्यातील जे आमदार आहेत. त्यांना आम्ही अनेक वर्षे मदत केली, लोकांचे प्रश्न सोडवू, असा त्यांनी शब्द दिला होता. प्रामाणिकपणानं संघर्षात बरोबर राहू, असंही सांगितलं होतं. पण आज ते कुठे गायब झाले आहेत, कळत नाही. ठीक आहे, तुम्ही तुमची कारखानदारी वाढली, त्याबद्दल माझी काही तक्रार नाही.
मी सोलापूर जिल्ह्याचा संपर्कमंत्री होतो, त्यावेळचं माझं रेकॉर्ड काढा. जास्तीत जास्त पैसे हे बबनदादा सांगतील किंवा सहकारी सांगतील त्यांना मी दिले आहेत. हा महाराष्ट्राच्या रेकॉर्डमधील हिस्सा आहे. ते कुठलेही काम घेऊन आले, तर माझी त्याला मान्यता असायची.”
ते पुढे म्हणाले, ” शिंदे हे प्रामाणिकपणे जनतेच्या हिताची जपणूक करतात, असा माझ्यासारख्याचा समज होता. पण नंतरच्या काळात लक्षात आलं की, हे जे काही करतात, ते शेतकऱ्यांसाठी किंवा गावच्या लोकांसाठी नाही तर पहिलं आपलं हित, स्वतःचा स्वार्थ याशिवाय त्यांनी दुसऱ्या गोष्टींकडे लक्ष दिलेले नाही.
जो स्वतःच्या स्वार्थाचा विचार करतो. त्यांना आपल्याला यत्किंचितही सहकार्य करण्याची आवश्यकता नाही.
आतापर्यंत जे कौतुक झालं, ते खूप झालं. या निवडणुकीत त्यांचं खरं चित्र आणि तुम्ही सत्याच्या संदर्भात काय करू शकता,
याचा निर्णय तुम्हाला २० तारखेच्या मतदानात घ्यायचा आहे”, असे म्हणत निवडणुकीत शिंदेंना मदत होणार नसल्याचे पवार यांनी स्पष्ट केले.
“करमाळा मतदारसंघात आज पाणी, वीज यांसारखे प्रश्न आहेत, तुम्ही नारायण पाटील यांना निवडून द्या.
हे प्रश्न सोडविण्यासाठी नारायणआबा, खासदार धैर्यशील मोहिते पाटील,
महाविकास आघाडीचे जे काही आमदार निवडून येतील, त्या सर्वांना घेऊन संबंधित अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतो
आणि हे प्रश्न कसे सुटत नाहीत, हे आम्ही पाहतो. तुमच्या प्रश्नाची ताकद सोडण्याची ताकद नारायण पाटील यांच्यात आहे,
त्यांच्या पाठीशी तुमची ताकद उभी करून मोठ्या मतांनी त्यांना निवडून द्या, असे आवाहनही पवार यांनी केले.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/
Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Kasba Peth Assembly Election 2024 | भाजपने गोवा निवडणुकीचा खर्च स्थायी समितीतून मिळालेल्या पैशातून केला;
‘मनसे’चे उमेदवार गणेश भोकरे यांचा हेमंत रासने यांच्यावर हल्लाबोल
Maharashtra Assembly Election 2024 | उद्धव ठाकरेंचे देवेंद्र फडणवीसांवर टीकास्त्र;
म्हणाले – ‘आधी स्वत:चं जॅकेट सांभाळा, मग धर्मयुद्ध करा’