Sharad Pawar On Batenge To Katenge | ‘बटेंगे तो कटेंगे’ प्रचारावर शरद पवारांचे भाष्य,” म्हणाले – ‘निवडणूका येतात आणि जातात पण…’
नांदेड: Sharad Pawar On Batenge To Katenge | विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवार राज्यभर दौरे करताना दिसत आहेत. दरम्यान पवार हे सरकारच्या धोरणांवर टीका करत आहेत. भाजपच्या ‘बटेंगे तो कटेंगे’ या प्रचारावर शरद पवार यांनी भाष्य केले आहे. सत्ताधारी पक्षाची जातीयवादी भूमिका आहेच आहे, ती पुन्हा एकदा त्यांनी समोर आणली आहे, अशी प्रतिक्रिया शरद पवार यांनी दिली आहे. (Maharashtra Assembly Election 2024)
शरद पवार म्हणाले, निवडणूका येतात आणि जातात पण धर्माधर्मात जातीजातीमध्ये तेढ निर्माण करण्याचे काम कुणी करू नये. पण भाजप आणि त्यांच्या मित्र पक्षांना याचे भान नाही. जातीयवादाकडे निवडणूक न्यावी यासाठीच योगी आदित्यनाथ यांना आणले जाते”, असे पवार यांनी म्हंटले आहे.
” नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीत आम्हाला चिंतेचे कारणच नाही महाविकास आघाडीच्या उमेदवाराची स्थिती चांगली आहे, इथले मतदार भाजपच्या विचारसरणीला अजिबात पाठींबा देणार नाहीत”, असे पवार यांनी म्हंटले आहे.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/
Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Maharashtra Assembly Election 2024 | बाळासाहेब थोरातांचे अजित पवारांना प्रत्युत्तर म्हणाले- “तुमचा बेभान खर्च कमी केला तर आमच्या योजना राबवता येतील”
Kothrud Assembly Election 2024 : दादा… तुम्ही फक्त विजयाचे पेढे घेऊन या!
Kasba Peth Assembly Election 2024 | सुप्रिया सुळेंच्या उपस्थितीत कसबा विधानसभा मतदारसंघात मविआची भव्य रॅली, रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद
Vadgaon Sheri Assembly Election 2024 | ‘तू तू ,मैं मैं’ ची लढाई करणार नाही ,पण चोख प्रत्यत्तर देऊ – सुप्रिया सुळे (Video)