Sharad Pawar On Bitcoin Scam | सुप्रिया सुळेंवर झालेल्या बिटकॉइनच्या आरोपावर शरद पवारांचे भाष्य; म्हणाले – ‘त्या अधिकाऱ्याला इतकं महत्व देण्याची गरज नाही’

Sharad Pawar-Supriya Sule

पुणे: Sharad Pawar On Bitcoin Scam | माजी पोलीस अधिकारी रवींद्र पाटील (Ravindra Patil Former IPS) यांनी निवडणुकीत परकीय चलन वापरल्याचा आणि आर्थिक व्यवहारांसाठी बिटकॉइनचा वापर केल्याचा आरोप केला होता. त्यानंतर विधानसभा निवडणुकीच्या (Maharashtra Assembly Election 2024) आदल्या रात्री (दि.१९) भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) आणि काँग्रेस नेते नाना पटोले (Nana Patole) यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. एका ऑडिओ क्लिपचा संदर्भ देत सुप्रिया सुळे बिटकॉईनचे व्यवहार करून निवडणुकांसाठी निधी जमा करत असल्याचा आरोप त्यांनी केला. (Sharad Pawar On Bitcoin Scam)

या आरोपावर बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या, ” माझ्यावर असे आरोप करण्यात आल्याचे काल संध्याकाळी मला कळाले. माझ्या हातात ते व्हॉईस रेकॉर्डिंग आल्यानंतर मी सर्वात आधी पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांना फोन केला.

काही बनावट रेकॉर्डिंग फिरत आहे आणि मला सायबर क्राईमकडे तक्रार करायची असल्याचे मी त्यांना सांगितले. मी काल संध्याकाळीच ऑनलाईन तक्रार दाखल केली. या सगळ्या रेकॉर्डिंग्स आणि मेसेजेस खोटे आणि बनावट आहेत”, असे सुळे यांनी म्हंटले.

दरम्यान याबाबत शरद पवार यांनी भाष्य केले आहे. शरद पवार म्हणाले, ” तो एकेकाळचा अधिकारी
जेलमध्ये होता, जो अधिकारी जेलमध्ये होता त्याला इतकं महत्व देण्याची गरज नाही. भाजप आणि अजित पवार यांचा या गोष्टीकडे पाहण्याचा दृष्टीकोन किती खालच्या पातळीचा आहे हे स्पष्ट होत आहे”, असे शरद पवार यांनी म्हंटले आहे.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Pune Police Tadipari Action | येरवडा परिसरातील 4 सराईत गुन्हेगार तडीपार ! पोलीस उपायुक्त हिंमत जाधव यांनी केली कारवाई

Maharashtra Assembly Election 2024 | दहा हजाराहून अधिक मतदार असलेल्या मतदान केंद्र इमारतींच्या ठिकाणी वाहन तळासाठी अतिरिक्त क्षेत्र उपलब्ध

Policeman Suicide News | तणावग्रस्त पोलीस कर्मचाऱ्यांची स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या; पोलीस दलात खळबळ

Maharashtra Assembly Election 2024 | मतदानासाठी मतदार ओळखपत्र नसल्यास ‘हे’ 12 प्रकारचे पुरावे ग्राह्य; मतदान केंद्रात मोबाईल घेऊन जाण्यास बंदी

Indapur Assembly Election 2024 | ‘दत्तात्रय भरणे सारख्या गद्दाराला पाडण्यासाठी पूर्ण ताकतीने काम करा’, जयंत पाटील यांचे इंदापूरमध्ये आवाहन

You may have missed