Sharad Pawar On Constitution | अजूनही संविधानावरचे संकट टळलेले नाही, सरकारला संवैधानिक संस्था आणि विचारधारांबाबत आस्था नाही : शरद पवार

sharad pawar

मुंबई : Sharad Pawar On Constitution | लोकसभा निवडणुकीत आपण संविधानाची भूमिका मांडली होती. जबाबदारीने सांगतो की, त्या निवडणुकीत काही प्रमाणात यश आले आहे. पण संविधानावरचे संकट टळले असा निष्कर्ष काढता येणार नाही. ज्यांच्या हातात देशाची सूत्र आहेत, त्यांचा संवैधानिक संस्था आणि विचारधारा, तरतूदी यांच्याबाबत आस्था नाही, असे वक्तव्य ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी केले. ते मुंबईत आयोजित महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) मेळाव्यात बोलत होते.

शरद पवार म्हणाले, महाराष्ट्राची संकटातून कशी सुटका करता येईल यासाठी मेळावा आयोजित करण्यात आला आहे. अनेकांची भाषणे झाली. प्रत्येकाने राज्यात जे परिवर्तन करायचे आहे, त्यासाठी काय करायचे याचे मार्गदर्शन केले. महाराष्ट्रापुरता विचार करण्याचे दिवस आहेत असे वाटत नाही. राज्याचा विचार करावाच लागेल. पण देशावरचे संकट पूर्णपणे गेलेले नाही, असे पवार यांनी म्हटले.

पवार म्हणाले, देशाच्या संसदेत आम्ही पाहतो की, देशाचे पंतप्रधान या संसदेची प्रतिष्ठा किती ठेवतात. लोकसभेच्या किंवा राज्यसभेच्या अधिवेशनात पंतप्रधान एकदाही सभेत आले नाही. त्या सदनाची किंमत प्रतिष्ठा आणि महत्त्व याकडे ढुंकून पाहत नाही. त्याची प्रचिती आम्हाला वारंवार येत आहे.

शरद पवार पुढे म्हणाले की, आजही काही संस्था आहेत. सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्ष. पंतप्रधान हे संस्था आहेत. विरोधी पक्षनेते हे संस्था आहेत. पंतप्रधानांची प्रतिष्ठा देशाने ठेवली पाहिजे. विरोधी पक्षाची प्रतिष्ठाही ठेवली पाहिजे. 15 ऑगस्टला विरोधी पक्षनेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना पाचव्या ओळीत बसवले होते.

शरद पवार म्हणाले, मी विरोधी पक्षनेता होतो, वाजपेयी पंतप्रधान होते. माझी बसण्याची सोय कॅबिनेट मंत्र्यांसोबत होती.
मनमोहन सिंग पंतप्रधान होते. तेव्हा दिवंगत सुषमा स्वराज या विरोधी पक्षनेत्या म्हणून कॅबिनेट मंत्र्यांसोबत बसल्या होत्या.
याचा अर्थ व्यक्ती महत्त्वाच्या नाहीत. त्या संस्था महत्त्वाच्या आहेत. त्यांची प्रतिष्ठा महत्त्वाची आहे.
या संस्था आहेत. लोकशाहीच्या संस्था आहेत. त्याचा सन्मान केला पाहिजे.

शरद पवार म्हणाले, लोकशाहीतील संस्थांचा सन्मान केला पाहिजे. ही राज्यकर्त्यांची जबाबदारी आहे.
त्यांच्याकडून मल्लिकार्जुन खरगे किंवा राहुल गांधी यांची प्रतिष्ठा राखली जाईल, अशी अपेक्षा ठेवली तर ती केली गेली नाही.
लोकशाहीच्या संस्थात्मक यंत्रणावर विश्वास नसलेले राज्यकर्ते देशाच्या सरकारमध्ये आहेत, असे पवार म्हणाले.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Bibvewadi Pune Crime News | हरवलेली मतीमंद मुलगी सीसीटीव्हीत कैद झाली आणि अपहरणाच्या शक्यतेने उडाली खळबळ,
रात्रभर शहर पोलिसांनी घेतला शोध

Khadki Pune Crime News | सोसायटीच्या सुरक्षा रक्षकाने केला 9 वर्षाच्या मुलीचा विनयभंग

Hadapsar Pune Crime News | पुणे : अल्पवयीन मुलांनी नामांकित शाळेतील मुलींचे नग्न फोटो तयार करुन केले व्हायरल

Ajit Pawar On Builders In Pune | बांधकाम व्यावसायिकांनी नदी, नाले, ओढयात अतिक्रमण आणि बांधकाम करू नये –
पालकमंत्री अजित पवार यांचे आवाहन

You may have missed