Sharad Pawar On Dhananjay Munde | ‘पक्ष फोडण्याचं काम तिघांनी केलं त्यामध्ये…’, धनंजय मुंडेंच्या मतदारसंघात शरद पवारांचा हल्लाबोल; म्हणाले – “बीडचा आदर्श उध्वस्त करणाऱ्यांना पराभूत करा”

Sharad Pawar-Dhananjay Munde

बीड : Sharad Pawar On Dhananjay Munde | राज्यात २० नोव्हेंबर रोजी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी (Maharashtra Assembly Election 2024) राजकीय नेत्यांच्या प्रचाराचा धुमधडाका सुरू आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात झालेल्या बंडामुळे राजकीय समीकरणं बदलली आहेत. त्यामुळे अनेक ठिकाणी राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी अशी लढत होत आहे. शरद पवार आज बीड दौऱ्यावर होते. परळीच्या (Parli Assembly) प्रचारसभेत बोलताना बीडचा (Beed Politics) आदर्श उध्वस्त करणाऱ्यांना पराभूत करा, असे आवाहन त्यांनी केले आहे.

शरद पवार म्हणाले, ” पक्ष म्हणून काही संकटे आली. अनेक अडचणी आहेत. राजकीय पक्ष उभा केला, काही लोकांनी पक्ष फोडण्याचं काम केलं. त्याच्यामध्ये तीन लोक प्रामुख्याने होते. राष्ट्रवादीमध्ये अंतर वाढवणारे, सहकाऱ्यांमध्ये गैर विश्वास वाढवणारे दोन-तीन लोक होते. त्या दोन तीन लोकांमध्ये कोण आहेत हे मी सांगण्याची आवश्यकता नाही.

ज्यांनी पक्ष सोडला, ज्यांनी समाजामध्ये अंतर वाढवण्याची भूमिका घेतली. ज्यांनी बीड जिल्ह्याचा आदर्श उध्वस्त करण्याचा प्रयत्न केला, अशा व्यक्तीला उद्याच्या निवडणुकीत पराभूत करा. राजेसाहेबांना मोठ्या मताधिक्याने विजयी करा”, असे आवाहन शरद पवार यांनी केले.

” आज बऱ्याच दिवसातून माझं परळीला येणं झालं. एक काळ असा होता, महाराष्ट्राच्या विधानसभेत आम्ही आणि सहकारी विरोधी पक्षात होतो. त्या काळामध्ये या परळीने आम्हाला एक जीवाभावाचा सहकारी दिला. त्यांचं नाव रघुनाथराव मुंडे होतं. ते आमदार होते. जिल्ह्याच्या प्रश्नामध्ये लक्ष घालणारे नेते होते.

माणसं जोडणं हा त्यांचा स्वभाव होता. दुर्दैवाने मुंबई शहरामध्ये त्यांचा अपघाती मृत्यू झाला. तो मृत्यू कशामुळे झाला? हे माझ्या सारख्याला अजून देखील उलगडलेलं नाही. त्यांची आठवण आमच्या अंतकरणामध्ये कायमची राहिली.

आणखी एका व्यक्तीची मला नेहमी आठवण होते. ते म्हणजे परळीची नगरपरिषद आणि त्याचं नेतृत्व राधाबाई यांच्याकडे होतं. त्या या शहराचं नेतृत्व करत होत्या. कष्ट करत होत्या. लोकांचे प्रश्न सोडवायच्या. एक लहान समाजाची महिला जबाबदारी मिळाल्यानंतर कसं काम करु शकते. त्याचं उदाहरण त्यांनी घालून दिलं”, असे शरद पवार यांनी सांगितलं.

ते पुढे म्हणाले, ” महाराष्ट्राच्या दृष्टीने महत्त्वाचं काम परळीने केलं.
कोणत्याही राज्याची प्रगती करायची असेल तर त्या राज्याला पाणी पाहिजे किंवा वीज पाहिजे.
महाराष्ट्राला वीज देण्याचं काम परळीतून होतं. अनेक लोक याठिकाणी काम करतात.
त्यांच्या कष्टातून विद्युत निर्मिती होते. परळीचं विद्युत केंद्र महाराष्ट्राच्या प्रगतीच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचं आहे.

कितीतरी लक्षात राहतील अशा गोष्टी परळीचे वैशिष्ट्य होतं. अलिकडच्या काळात परळीला काय झालंय मला माहिती नाही.
परळी मध्ये गुंडगिरी वाढली. मला येथील व्यापाऱ्यांची आणि दुकानदारांची पत्र येतात. त्यांना धंदा करता येत नाही.
येथील काही शक्तींना नियंत्रण पाहिजे. ही स्थिती बदलण्याची भूमिका घेतल्याशिवाय गत्यंतर नाही”,
असेही शरद पवार यांनी म्हंटले आहे.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Kothrud Assembly Election 2024 : दादा… तुम्ही फक्त विजयाचे पेढे घेऊन या!

Kasba Peth Assembly Election 2024 | सुप्रिया सुळेंच्या उपस्थितीत कसबा विधानसभा मतदारसंघात मविआची भव्य रॅली, रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद

Vadgaon Sheri Assembly Election 2024 | ‘तू तू ,मैं मैं’ ची लढाई करणार नाही ,पण चोख प्रत्यत्तर देऊ –
सुप्रिया सुळे (Video)

You may have missed