Sharad Pawar On EVM | ठरलं! आता मागे हटायचं नाही, लढायचं; ईव्हीएम विरोधात कायदेशीर लढ्यासाठी वकिलांची टीम मैदानात, शरद पवार म्हणाले…
मुंबई: Sharad Pawar On EVM | विधानसभा निवडणुकीत (Maharashtra Assembly Election Results 2024) महायुतीला (Mahayuti) प्रचंड बहुमत मिळालं तर महाविकास आघाडीला (Mahavikas Aghadi) मोठा फटका बसला. शिवसेना ठाकरे गट (Shivsena Thackeray Group) आणि राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या पराभूत आमदारांची आज (दि.२६) मुंबईत बैठक झाली. या बैठकीत पराभूत आमदारांनी निकालावर संशय व्यक्त करत ईव्हीएमच्या आकडेवारीवर आणि टक्केवारीवर संशय व्यक्त केला आहे. त्यानंतर, पक्षप्रमुखांनी देखील ही बाब गांभीर्याने घेत ईव्हीएमविरोधात ठोस भूमिका घेण्याचे ठरवले असल्याची माहिती आहे.
दरम्यान, पार पडलेल्या बैठकीत उमेदवारांनी केलेल्या तक्रारी संदर्भात एक वकिलांची टीम करण्याचा निर्णय पक्षाचे प्रमुख शरद पवारांनी घेतला आहे. शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून राज्यपातळीवर एक आणि केंद्रीय पातळीवर एक कायदेशीर लढाई लढण्यासाठी वकिलांची टीम गठित करण्यात आल्याची माहिती आहे.
उमेदवारांना २८ तारखेपर्यंत व्हीव्हीपॅट तपासणीसाठी वेळ असल्याने उमेदवारांनी तत्काळ व्हीव्हीपॅट तपासणी करावी. केवळ आरोप करण्यापेक्षा ईव्हीएमबाबत जे आक्षेप आहेत किंवा निवडणूक प्रक्रियेत ज्या चुकीच्या बाबी घडल्या ते सर्व पुरावे गोळा करण्याच्या सूचना देखील शरद पवारांकडून उमेदवारांना देण्यात आल्या आहेत. आता मागे हटायचं नाही, लढायचं असा संदेशही पवारांकडून देण्यात आला आहे.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/
Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Sahakar Nagar Pune Crime News | पुणे : अनैसर्गिक कृत्य करायला लावून धमकाविल्याने दहावीतील मुलाची आत्महत्या
Eknath Shinde To Shivsainik | मुख्यमंत्रीपदावरून साशंकता, एकनाथ शिंदेंचे शिवसैनिकांना भावनिक
आवाहन; म्हणाले – ‘माझ्यावरील प्रेमापोटी…’
Ulhas Dhole Patil | माजी महापौर उल्हास ढोले पाटील यांचे निधन
Kondhwa Pune Crime News | कोंढवा: नराधम पित्याने अल्पवयीन मुलीवर केला लैंगिक अत्याचार