Sharad Pawar On EVM | मारकडवाडीतुन शरद पवारांचा इशारा; म्हणाले – ‘… तोपर्यंत स्वस्थ बसणार नाही’
सोलापूर : Sharad Pawar On EVM | माळशिरस विधानसभा (Malshiras Assembly) मतदारसंघातील मारकडवाडी (Markadwadi) गावात ग्रामस्थांनी बॅलेट पेपरवर मतदान घेण्याचा निर्णय घेतला होता, परंतु प्रशासनाने याला विरोध केला. ग्रामस्थांनी निवडून आलेल्या उमेदवाराला त्यांच्या गावातून कमी मते कशी मिळाली याचा तपास करण्यासाठी पुन्हा बॅलेट पेपरवर मतदान घेण्याचा निर्णय घेतला. मात्र त्याआधीच पोलिसांनी जमावबंदी लागू केली. त्यामुळे ही प्रक्रिया पार पाडली गेली नाही. मात्र या गावाकडे राज्याचे लक्ष वेधले आहे.
विरोधकांच्या ईव्हीएम विरोधातील लढ्याचे केंद्र मारकडवाडी बनले आहे. या पार्श्वभूमीवर आज राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्षप्रमुख शरद पवार मारकडवाडी गावच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी माध्यमांशी बोलताना शरद पवार यांनी याबाबतच्या एकूण घडामोडीवर भाष्य केले आहे.
शरद पवार म्हणाले, ” अमेरिकेत आजही मतदान पत्रिकेवर मतदान होत असून अनेक देशांनी ईव्हीएमचा त्याग केला आहे. लोकांच्या मनात शंका आहेत त्यांचं निरसन झाले पाहिजे, निवडणूक पद्धतीबाबत प्रश्नांची सोडवणूक झाल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही.
मारकडवाडी गावाने मतदान पत्रिकेवर मतदान घेण्याची मागणी केली. पण पोलिसांनी जमावबंदी लागू केली. गावाची चर्चा देशभर होत आहे. हे गाव कुठे आहे? अशी विचारणा होत आहे. आम्ही काही माहीती गोळा केली. ती माहिती काय सांगते, लोकांनी मतदान केलं मात्र निकाल जे आले ते त्यांना अपेक्षित नाही. यात बदल केला पाहीजे, याबाबत तुम्ही लोकांनी जागृती केली.
ते पुढे म्हणाले, ” पोलिसांनी गावातच जमावबंदी लागू केली, उद्या पोलिस खातं असाही निर्णय घेईल की,
मी बोलायचं नाही आणि तुम्ही ऐकायचं नाही, असा कुठं कायदा असतो का? मुख्यमंत्री म्हणाले की पवार साहेबांनी जाणे चुकीचे आहे,
मला सांगा शंकेची माहिती घेऊन निरसन करणे चुकीचे आहे का?
लोकशाही कशासाठी आहे. इथे आम्हाला राजकारण आणायचं नाही, लोकांच्या शंकेंचे निरसन करण्याचे आहे.
त्यांच्याच गावात जमावबंदी करण्याचे कारण काय होते?”, असा सवाल पवारांनी उपस्थित केला.
माळशिरस विधानसभा मतदारसंघात भाजपकडून राम सातपुते
तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून उत्तमराव जानकर (Uttam Jankar) निवडणुकीच्या रिंगणात होते.
मारकडवाडी ग्रामस्थांनी भाजपच्या राम सातपुतेंना मिळालेल्या मताधिक्यावर आक्षेप घेतला आहे.
भाजप उमेदवार राम सातपुते (Ram Satpute) यांना १००३ मतं मिळाली,
तर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उत्तम जानकर यांना ८४३ मतं मिळाली. ग्रामस्थांनी या आकडेवारीवर आक्षेप नोंदवत,
इतके कमी मतदान उत्तम जानकरांना कसे मिळू शकते? असा सवाल ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे. (Sharad Pawar On EVM)
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/
Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Daund Leopard Attack | पुणे / दौंड: बिबट्याच्या हल्ल्यात महिलेचा मृत्यू; परिसरात भीतीचे वातावरण
Ozar Pune Accident News | पुणे : मोटारसायकल आणि कारच्या धडकेत एकाचा दुर्दैवी मृत्यू;
अपघातानंतर कार चालकाने पळ काढला