Sharad Pawar On Exit Poll Maharashtra | “एक्झिट पोलचा लोड घेऊ नका”, शरद पवारांचा उमेदवारांना सल्ला, मविआ किती जागा जिंकेल? आकडाही सांगितला, म्हणाले,…
पुणे: Sharad Pawar On Exit Poll Maharashtra | महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीच्या निकालाकडे सध्या देशाचं लक्ष लागून आहे. मागील पाच वर्षांमध्ये झालेल्या सर्व घडामोडींनंतर आणि विशेषत: पक्षफुटीनंतर होणारी ही पहिली निवडणूक आहे. त्यानंतर लोकांचं मत कुणाला मिळणार हे पाहणं औत्युक्याचं ठरणार आहे. (Maharashtra Assembly Election 2024)
उद्या (दि.२३) निकाल जाहीर होणार आहेत. मतदानानंतर राज्यात विविध संस्थानी एक्झिट पोलही जाहीर केले. यातील बहुतांश पोल्समधील आकडेवारी नुसार महाराष्ट्रात महायुती (Mahayuti) बहुमताचा आकडा पार करेल आणि सत्ता स्थापन करेल, असा दावा करण्यात येत आहे.
आता शरद पवार यांनी मविआ (Mahavikas Aghadi) किती जागा जिंकेल याबाबत भाष्य केले आहे. सत्तास्थापनेसाठी १४५ जागांची आवश्यकता आहे, त्यापेक्षा १२ जागा जास्त महाविकास आघाडीला मिळत असल्याचा दावा पवारांनी केला आहे.
शरद पवार यांनी आपल्या उमेदवारांची ऑनलाईन बैठक घेतली. राज्यभरातून शरद पवार राष्ट्रवादीचे सर्व उमेदवार या बैठकीला उपस्थित होते. या बैठकीत एक्झिट पोलवरही चर्चा करण्यात आली. यावेळी शरद पवारांनी या एक्झिट पोलचा लोड घेऊ नका, असा सल्ला आपल्या उमेदवारांना दिला. महाविकास आघाडीच्या १५७ जागा येतील असे शरद पवार यांनी म्हंटले आहे.
जोवर निकाल लागत नाही तोवर मतमोजणी केंद्र सोडायचे नाही, असा आदेशच पवारांनी आपल्या उमेदवारांना दिला आहे. जिंकल्यावर प्रमाणपत्र घेऊनच थेट मुंबई गाठण्याची व्यवस्था करून ठेवा, असेही पवारांनी म्हटले आहे.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/
Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा