Sharad Pawar On Maharashtra Assembly Election 2024 | “तुम्ही कसे निवडून येत नाही ते बघतो, इथली निवडणूक आपण जिंकू”; पवारांच्या विधानाने राजकीय वर्तुळात चर्चा
सातारा : Sharad Pawar On Maharashtra Assembly Election 2024 | लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर महाविकास आघाडीचा (Mahavikas Aghadi) आत्मविश्वास वाढलेला आहे. आता आगामी विधानसभा निवडणुकांसाठी शरद पवार यांनी तयारी सुरु केलेली आहे. ठिकठिकाणी त्यांनी भेटी देत शेतकऱ्यांशी संवाद वाढवलेला आहे. निवडणुकीसाठी पवार रणनीती आखत आहेत. अशातच ‘तुम्ही कसे निवडून येत नाही ते बघतो’ हे त्यांनी केलेले विधान सध्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरत आहे. (Satara Assembly Election)
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवार राज्यातील विविध ठिकाणी बैठका घेत आहेत. कार्यकर्त्यांची संवाद साधत आहेत. पदाधिकारी, नेते यांच्याशीही आगामी विधानसभा निवडणुकीबाबत चर्चा करत असल्याचे सांगितले जात आहे. एका बैठकीनंतर कार्यकर्त्यांशी संवाद साधताना इथली निवडणूक आपणच जिंकू, असा दावा शरद पवार यांनी केला आहे. (Sharad Pawar On Maharashtra Assembly Election 2024)
“तुम्हाला एवढेच सांगतो की, तुम्ही एकत्र राहा, तुम्ही कसे निवडून येत नाही, हेच मी बघतो. तुमच्या सगळ्यांच्या मदतीने इथली निवडणूक आपण जिंकू. महिन्या-पंधरा दिवसांत सगळे एकत्र बसून चर्चा करून मला येऊन सांगा. बारामतीत सांगा, नाहीतर पुणे-मुंबईत येऊन सांगा की, आता आम्ही एक झालो आहोत. आमच्यापैकी कुणालाही तुम्ही संधी द्या, आम्ही त्याच्यासाठी काम करतो. एवढे तुम्ही मला सांगा “, असे शरद पवार यांनी कार्यकर्त्यांना सांगितले अन् विजयाचा शब्द दिला. शरद पवार यांनी रविवारी साताऱ्यात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांसमोर बोलताना निवडणुकीबाबत हे मोठे विधान केले आहे. पवारांच्या या विधानामुळे आता साताऱ्यात ते कोणता डाव टाकणार याची चर्चा सुरु झाली आहे.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Pune Hit & Run Case | पुणे हिट अँड रन: ऑनड्युटी असलेल्या 2 पोलीस कर्मचाऱ्यांना उडवलं,
एकाचा मृत्यू तर एक गंभीर
Rain In Lonavala Khandala | लोणावळा, खंडाळ्यात संततधार; पाऊस, धुके अन् पर्यटकांची गर्दी
Sharad Pawar On Devendra Fadnavis | “फडणवीसांचा सुरुवातीचा काळ मला चांगला वाटला पण आता…”
शरद पवारांचे मोठे विधान