Sharad Pawar On Maharashtra Assembly Election | ‘राजकीय परिस्थिती 2019 पेक्षा या निवडणुकीत पूर्णपणे वेगळी”, शरद पवारांचे महत्वाचे भाष्य; म्हणाले – ‘6 नोव्हेंबरपासून प्रचाराला सुरुवात’

पुणे: Sharad Pawar On Maharashtra Assembly Election | विधानसभा निवडणुकीच्या दृष्टिकोनातून महायुती आणि महाविकास आघाडीकडून प्रचाराला सुरुवात झालेली आहे. मात्र अनेक मतदारसंघात झालेल्या बंडखोरीमुळे नेत्यांची डोकेदुखी वाढली आहे. दरम्यान आता निवडणुकीच्या अनुषंगाने बंडखोरी आणि प्रचाराची तयारी याबाबत शरद पवार यांनी भाष्य केले आहे. (MH Election 2024)
माध्यमांशी बोलताना शरद पवार म्हणाले, ” १०-१२ ठिकाणी जे काही थोडेफार मतभेद आहेत ते दूर होतील. जिथे दोन उमेदवारांनी अर्ज भरले आहेत तिथे मार्ग काढला जाईल. ६ नोव्हेंबरपासून मी, राहुल गांधी, उद्धव ठाकरे आणि इतर सगळेच प्रचार सुरु करतो आहोत.
महाराष्ट्रातली राजकीय परिस्थिती २०१९ पेक्षा या निवडणुकीत पूर्णपणे वेगळी आहे. महाराष्ट्रात २०२४ ला युती विरुद्ध आघाडी अशी लढत होती. आता शिवसेना आणि राष्ट्रवादी हे दोन पक्ष फुटले आहेत त्यांचे चार पक्ष तयार झाले आहेत. सध्याची लढत ही महाविकास आघाडी विरुद्ध महायुती अशी आहे. या लढतीत सत्तेतले तीन पक्ष आणि विरोधातले तीन पक्ष असे सहा पक्ष समोरासमोर आहेत.”
ते पुढे म्हणाले,” राज ठाकरेंचा (Raj Thackeray) मनसे हा पक्ष काय कामगिरी करतो ? वंचित बहुजन आघाडी (Vanchit Bahujan Aghadi-VBA) आणि तिसऱ्या आघाडीची (Maharashtra Third Front) कामगिरी कशी असेल? जरांगे (Manoj Jarange Patil) फॅक्टरचा परिणाम कसा होईल ? हे सगळं पाहणं महत्त्वाचं असणार आहे. सगळ्या पक्षांचं जागावाटप जवळपास पूर्ण झालं आहे. मात्र अनेक ठिकाणी समोरासमोर उमेदवार देण्यात आले आहेत. मात्र हा प्रश्न चर्चेने सुटेल”, असा विश्वास शरद पवार यांनी व्यक्त केला आहे.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/
Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Chinchwad Assembly Election 2024 | राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार राहुल कलाटेंवर अदखलपात्र गुन्हा दाखल; वंचितच्या उमेदवाराला जीवे मारण्याची धमकी
Katraj Pune Crime News | कात्रजमध्ये गुंडांचा हैदोस ! तरुणांना मारहाण करुन रिक्षा, कारच्या काचा फोडून माजवली दहशत
Maharashtra Assembly Election 2024 | केवळ उमेदवारांच्या प्रतिज्ञापत्रातून शासनाने कमविले किमान 43 लाख 62 हजार रुपये जादा