Sharad Pawar On Maharashtra Finance Situation | ‘एक-दोन महिन्यांमध्ये राज्याची खरी आर्थिक स्थिती समोर येईल’,शरद पवारांकडून चिंता व्यक्त, म्हणाले – ‘फडणवीसांवर विश्वास पण…’

Sharad-Pawar-Devendra-Fadnavis

बारामती: Sharad Pawar On Maharashtra Finance Situation | विधानसभा निवडणुकीच्या (Maharashtra Assembly Election 2024) पार्श्वभूमीवर सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर आरोप- प्रत्यारोप करताना दिसत आहेत. आज शनिवार (दि.२) बारामतीच्या गोविंद बागेतील (Govindbaug Baramati) मेळाव्यानंतर आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना शरद पवार यांनी राज्याच्या आर्थिक स्थितीवर भाष्य केले आहे.

राज्याचे अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) ही महाराष्ट्राची आर्थिक स्थिती उत्तम असल्याचे सांगतात. आपण सगळे सरकार आणि अर्थमंत्र्यांच्या म्हणण्यावर विश्वास ठेवत असतो. पण विधानसभा निवडणूक संपल्यानंतर एक-दोन महिन्यांमध्ये राज्याची खरी आर्थिक स्थिती समोर येईल, असे शरद पवार यांनी म्हंटले आहे.

पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार मंडळाच्या अहवालाबाबत भाष्य करताना शरद पवार म्हणाले, ” सध्या राज्यातील सत्ताधाऱ्यांनी काही योजनांसाठी गरीबांसाठी असणाऱ्या योजनांचा निधी वळविला आहे. गेल्या दोन-तीन महिन्यांपासून गरीबांच्या पदरात काहीही पडलेले नाही. मला महाराष्ट्राच्या आजच्या स्थितीची चिंता वाटते. कारण काही महत्त्वाचे प्रश्न हाताळायला सध्याच्या राज्यकर्त्यांना अपयश आलं आहे.

केंद्र सरकार अर्थखात्याशी संबंधित एका विभागाने आर्थिक कामगिरीच्या जोरावर देशातील राज्यांचे रँकिंग जाहीर केले आहे. जे राज्य एकेकाळी क्रमांक एकला होते, ते पहिल्या पाचमध्ये नाही. याशिवाय, उत्पन्न आणि दरडोई उत्पन्नासंदर्भातही महाराष्ट्रासाठी धक्कादायक परिस्थिती आहे. हा पंतप्रधानांसोबत काम करणाऱ्या लोकांनी तयार केलेला अहवाल आहे.

ते पुढे म्हणाले, ” अर्थव्यवस्था मजबूत करायला जी पावलं पाहिजेत त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. नुसतं राजकारण करुन प्रश्न सुटत नाहीत. त्यामुळे परिस्थिती किती गंभीर आहे, हे लक्षात घ्यायला पाहिजे. या सगळ्यातून मार्ग काढायचा असेल तर सत्तेमध्ये परिवर्तन करण्याशिवाय पर्याय नाही.

राज्यात बदल झालाच पाहिजे. ज्यांच्यात बदल घडवायची ताकद असली पाहिजे, त्यांना जनतेने सत्तेत आणले पाहिजे. आपण सामूहिक प्रयत्नाने परिवर्तन आणू शकतो, हाच निर्धार पाडव्याच्या दिवशी केला पाहिजे, असे शरद पवार यांनी म्हटले आहे.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Maharashtra Politics | शायना एनसी प्रकरणी शरद पवारांकडून अरविंद सावंत यांची पाठराखण; म्हणाले – ‘अरविंद सावंत यांचं वक्तव्य वैयक्तिक हल्ला होत नाही’

Sharad Pawar News | ‘सत्तेसाठी आमचा पक्ष, चिन्ह आणि सर्व हिसकावण्याचा प्रयत्न’, शरद पवारांचे वक्तव्य; म्हणाले – ‘सन 1980 ची पुनरावृत्ती झाल्याशिवाय राहणार नाही’