Sharad Pawar On Mahayuti Govt | शरद पवारांचं वक्तव्य चर्चेत म्हणाले, “लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य पुन्हा येईल, अशी स्थिती…”

Sharad Pawar

मुंबई : Sharad Pawar On Mahayuti Govt | आगामी विधानसभा निवडणुकीच्या (Maharashtra Assembly Election 2024) पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापू लागलं आहे. लोकसभेला चांगले यश मिळाल्याने महाविकास आघाडीचा (Mahavikas Aghadi) आत्मविश्वास वाढलेला आहे. तर दुसरीकडे लोकसभेला फटका बसलेल्या महायुतीने लोकसभेची आगामी विधानसभेला पुनरावृत्ती टाळण्यासाठी कंबर कसली आहे.

https://www.instagram.com/p/DAEK4cUidK4

दरम्यान शेवटच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात महायुती सरकारने विधानसभा डोळ्यासमोर ठेवून अनेक योजनांची घोषणा केली. त्यातील ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ (Ladki Bahin Yojana) चर्चेत आहे. राज्यात सर्वत्र या योजनेची चर्चा आहे. लोकांच्या पसंतीस ही योजना उतरलेली आहे. ज्याचा फायदा आगामी निवडणुकीत मतदारांना आकर्षित करण्यासाठी महायुतीतल्या पक्षांना होणार आहे.

https://www.instagram.com/p/DAEGvJiiw03

दरम्यान आता लाडकी बहीण योजनेवर शरद पवार यांनी महत्वाचे विधान केले आहे. माध्यमांशी बोलताना शरद पवार म्हणाले, “महाराष्ट्रात महिला सुरक्षेचा प्रश्न महत्त्वाचा आहे. बेरोजगारी, महागाईचा विचार बहिणी करतील. रोज वर्तमानपत्र पाहिलं तर स्त्रियांवरच्या अत्याचाराची (Crime Against Woman) बातमी नित्याची झाली आहे आणि ही बाब क्लेशदायक आहे.

https://www.instagram.com/p/DAEElXKiEyu

खऱ्या अर्थाने लाडक्या बहिणींना सुरक्षेची आणि सन्मानाची गरज आहे. पैसे देऊन टीव्हीवर आणि वर्तमानपत्रात जाहीरात देऊन तुम्ही त्यांच्याबद्दल आस्था दाखवत नाही हे लक्षात ठेवा, महिलांवरची अत्याचार कमी झालेले नाहीत तर वाढलेले आहेत”, असं शरद पवार यांनी स्पष्ट केलं.

https://www.instagram.com/p/DAEB87Ui2fE

ते पुढे म्हणाले, ” १ कोटी पेक्षा जास्त महिलांना पैसे दिल्याचा दावा केला जातो आहे. अजून दोन हप्ते देतील. लाडकी बहीण योजनेचा परिणाम थोडासा होईल, फार काही फरक पडणार नाही. समाजात, लोकांच्यात, बहिणींच्या घरात बेकारीचा प्रश्न आहे. महागाई, स्त्रियांवरच्या अत्याचाराचा प्रश्न आहे. विकासाच्या बाबत ही भरीव कामगिरी आहे असंही दिसत नाही. या गोष्टींचा विचार बहिणी नक्की करतील.

https://www.instagram.com/p/DAEA2w9CkCu

गावागावात जातो, मेळावा घेतो, बहि‍णींशी संवाद करतो, त्या अनेक प्रश्न प्रकर्षानं मांडतात, लाडकी बहीणचा फार परिणाम जाणवणार नाही, पैशांचा परिणाम थोडाफार होईल पण त्यांचं राज्य पुन्हा येईल, अशी स्थिती नाही”, असंही शरद पवार यांनी म्हटलं आहे.

https://www.instagram.com/p/DADq4pVizoC

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या दोन टर्म झाल्या आहेत. तिसऱ्या टर्म सुरु आहे.
लाडकी बहीण योजनेचं कौतुक पंतप्रधान करुन गेले.
मात्र महिलांच्या व्यथा आणि दुःख त्यांना दिसलं नाही का? असा प्रश्नही पवारांनी उपस्थित केला.

https://www.instagram.com/p/DADiAMoi7ql

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Chandrakant Patil Convoy Car Accident | मद्यपी चालकाची ताफ्यातील गाडीला धडक; मंत्री चंद्रकांत पाटील थोडक्यात बचावले

Punit Balan – Bhau Rangari Ganpati | बाप्पा माझे गुरू, कुटुंबातील सदस्य ! बाप्पाला निरोप देताना पुनीत बालन भावूक (Video)

Sangvi Pune Crime News | सांगवीत गाड्या फोडताना पाहिल्याने गतीमंद तरुणावर कोयत्याने वार करुन केला खुनाचा प्रयत्न

Mahayuti Seat Sharing Formula | महायुतीचा जागावाटपाचा पेच संपला 80 नाही 90 नाही; बावनकुळेंनी सांगितला नवा फॉर्म्युला

You may have missed